मृत व्यक्तीबद्दल वाईट बोलणं का टाळावं? वाचा अपशब्द वापरण्याबाबत शास्त्र काय सांगतं

Why not speak ill of dead person: धर्मग्रंथांमध्ये भाषेचे महत्व अधोरेखित केले आहे. विशेषतः मृत व्यक्तीबद्दल वाईट बोलणे किंवा अपशब्द वापरणे हे पाप मानले गेले आहे. मृत व्यक्तीला आदर देणे ही समाजाची आणि धर्माची परंपरा आहे.
Why not speak ill of dead person
Why not speak ill of dead personsaam tv
Published On

एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याची निंदा करू नये असं म्हटलं जातं. शास्त्रात असं म्हटलंय की, आपण कोणाच्याही मृत्यूनंतर टीका करणं टाळलं पाहिजे. जरी त्या व्यक्तींनी तुम्हाला आयुष्यात खूप दुःख दिलं असेल तरीही त्यांची निंदा करू नये. जेव्हा ते आपल्यासोबत नसतील तेव्हा आपण त्यांचा अपमान करणं टाळलं पाहिजे.

याचं कारण म्हणजे ते शारीरिकदृष्ट्या आपल्यासोबत नसले तरी त्यांच्याशी असलेलं आपलं कर्माचं नातं सक्रिय राहतं. जर आपण त्यांच्यावर टीका केली किंवा हसलो तरी आपलं भावनिक नातं कायम राहतं.

एखाद्याची निंदा करणं गंभीर गुन्हा

मनुस्मृतीनुसार, कोणाचीही निंदा करणं हा गंभीर गुन्हा आहे. विशेषतः मृत व्यक्तीची मस्करी केल्याने नरकातही स्थान मिळत नाही. प्राचीन धर्मग्रंथांमध्येही याची उदाहरणं स्पष्ट करण्यात आली आहेत. महाभारतातील शांती पर्वामध्येही युधिष्ठिरने भीष्म पितामहांकडून हाच धडा शिकला की, चुकूनही मृत व्यक्तीचा अपमान करू नये.

Why not speak ill of dead person
Astrology today: आजचा दिवस खास! एकादशी योग, शुभ नक्षत्र आणि चार राशींवर मिळणार ग्रहांचा जबरदस्त आशीर्वाद

असं केल्याने आपल्या उर्जेवर नकारात्मक परिणाम होतो आणि आपल्या उपचार शक्तींना अडथळा येतो. त्या व्यक्तींनी जिवंत असताना त्यांच्या वाईट सवयी सोडल्या नसतील पण त्यांची निंदा करून आपण चांगले होणार आहोत का? म्हणून, त्यांच्या मृत्यूनंतर आपण एखाद्याला हसणं किंवा त्यांची चेष्टा करणं टाळलं पाहिजे.

एखाद्याच्या मृत्यूनंतर त्याचं वाईट का चिंतू नये?

  • जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा ती स्वतःचा बचाव करण्याच्या स्थितीत नसते. त्यांच्याबद्दल वाईट बोलणं गमतीचं असू शकतं, परंतु ते एक भ्याड कृत्य मानलं जातं.

  • एखाद्याच्या मृत्यूनंतर तुम्ही त्यांच्याबद्दल जे बोलता ते मृत व्यक्तीची नाही तर तुमची मानसिकता दर्शवतं.

Why not speak ill of dead person
Tuesday Horoscope : तुम्ही भाग्यशाली ठरणार; लाडक्या गणरायाच्या कृपेने इच्छा पूर्ण होणार, तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?
  • ती व्यक्ती कदाचित गेली असेल, पण त्यांचे प्रियजन अजूनही जिवंत आहेत. तुम्ही बोललेल्या गोष्टी त्यांना दुखवू शकतात.

  • प्रत्येक व्यक्तीमधये चांगले आणि वाईट दोन्ही गुण असतात. मृत्यूनंतर फक्त वाईट गुणांची गणना करणं हे एक अपूर्ण सत्य आहे.

Why not speak ill of dead person
Astrology predictions: आजचा दिवस आत्मविश्वास वाढवणारा; मंगळवार, कृष्ण चतुर्थी आणि प्रीति योगाचा विशेष प्रभाव

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com