

श्री वासुदेव सत्रे
ज्योतिष व वास्तुशास्त्र मार्गदर्शक, मोबाईल नंबर - 9860187085
आजचे राशीभविष्य, ६ जानेवारी २०२६
मेष - कठोर निर्णय घ्यायची वेळ येईल. डगमगायचं नाही. आधी मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धी चे कारण. ही उक्ती लक्षात ठेवावी.
वृषभ - महत्वाच्या कामात गाफिल राहू नका. सतर्क राहावं, विचार करून निर्णय घ्यावा. श्रीकृष्णाची उपासना करावी.
मिथुन - नवीन परिचय होतील, फायदा करून घ्यावा. व्यवहारांत लक्ष ठेवावं, संबंध आणि व्यवहार यात गल्लत होता कामा नये.
कर्क - स्वभावात चलाखी राहील. कोणी गैरसमज करून घेणार नाही याची काळजी घ्यावी. कोणाचीही सहज चेष्टा करणं टाळावं.
सिंह - संपूर्ण दिवस कार्यमग्न राहील. सामाजिक किंवा वैयक्तिक जीवनात लक्ष द्यायला वेळ पण भेटणार नाही. रात्री निवांत झोप लागेल.
कन्या - प्रेमप्रकरणात गुंतुन राहिलात तर नाहक त्रास होईल. "नंतर विक्रम प्रथम योजना" ही म्हण लक्षात ठेवा. विवाह इच्छुकांचे शुभ योग आहेत.
तुला - पत्नी सोबत वाद टाळावेत. रागावर नियंत्रण ठेवणे. मित्रमंडळी सोबत दिवस घालवावा. ईष्ट देवतेची उपासना वरदान ठरेल.
वृश्चिक - समाजात कौतुक होईल. आनंद वार्ता मिळेल. फक्त होरपळून जायला नको. अतिउत्साही स्वभावात नियंत्रण ठेवणे.
धनू - "आपुला आपण करावा विचार, तरावया पार भवसिंधु" ही म्हण लक्षात ठेवा. इतरांची मदत करण्याआधी स्वतः कडे लक्ष द्या. काही प्रमाणात स्वार्थी व्हावं.
मकर - संकटांची सुट्टी होईल. गणपतीची उपासना करावी. गरिबांना दुधाचे गोड पदार्थ दान करावेत." राखावी बहुतांची अंतरे, भाग्य येती तदनंतरे " हे वाक्य लक्षात ठेवा.
कुंभ - संततीच्या तब्येतीची काळजी घ्यावी. अपत्त्यांसोबत वेळ घालवावा. होणारी चिडचिड नियंत्रणात ठेवावी. मारुतीची उपासना करावी.
मीन - अतिशय आनंदी दिवस आहे. शनि महाराजांची अनन्य साधारण कृपा होईल. "क्षण त्याने कूतो विद्या, कण त्यागे कूतो धनम्" प्रत्येक गोष्टींचा योग्य उपयोग करावा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.