Pregnancy Care: प्रसूतीनंतर केस गळतीची भीती? तज्ज्ञांनी सांगितलं खरं कारण अन् उपाय

Hair Loss After Pregnancy: प्रसूतीनंतर केस गळणे व टेक्स्चर बदलणे ही सामान्य बाब आहे. हार्मोनल बदल, थकवा, ताण आणि पोषणाची कमतरता यामुळे हे होते. योग्य आहार व विश्रांतीमुळे सुधारणा शक्य.
natural process of hair changes after pregnancy
postpartum hair loss expert advice google
Published On
Summary
  1. प्रसूतीनंतर केस गळणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे.

  2. हार्मोनल बदल, थकवा व पोषणातील कमतरता हे मुख्य कारण आहेत.

  3. केसांचे टेक्स्चर तात्पुरते बदलू शकते.

  4. योग्य आहार व विश्रांतीमुळे केस हळूहळू आधी सारखे होतात.

महिलांच्या आयुष्यातला एक मोठा टप्पा म्हणजे त्यांना मुल होणे. बाळाच्या जन्मानंतर मनात प्रेमाचा ओघ उसळतो, मात्र त्याच वेळी प्रसूतीमुळे शरीर थकलेले, नाजूक आणि शरीरात बदललेले जाणवतात. हार्मोन्समध्ये होणारे चढउतार, शक्ती कमी-जास्त होणे, मानसिक व भावनिक बदल या सगळ्यात महिला नव्या रूपाशी जुळवून घेत असते. या बदलांचा परिणाम फक्त शरीरावरच नाहीतर केसांवर जाणवतो. अनेक महिलांना प्रसूतीनंतर मोठ्या प्रमाणावर केस गळतीच्या समस्येला सामोरे जावे लागते. यालाच हार्मोनल बदल कारणीभूत असतात.

तज्ज्ञांच्या मते, प्रसूतीनंतर फक्त केस गळत नाहीत तर केसांच्या टेक्स्चरमध्येही बदल होतो. ज्या महिलांचे केस कुरळे होते ते सरळ होऊ शकतात, तर सरळ केस कुरळे होऊ शकतात. गर्भधारणेदरम्यान अनेक महिलांचे केस दाट, चमकदार आणि भरगच्च सुद्धा होतात. मात्र बाळ जन्मल्यानंतर हार्मोन्स अचानक कमी झाल्याने केस झपाट्याने गळतात.

natural process of hair changes after pregnancy
Liver Symptoms: लिव्हर खराब होण्यापूर्वी शरीर देतं 'असे' संकेत, जाणून घ्या कोणती आहेत ती लक्षणं...

तज्ज्ञांच्या मते, हे बदल फक्त हार्मोन्समुळेच होत नाहीत, तर प्रसूतीनंतर होणारा शारीरिक आणि मानसिक ताणतही बदल होतात. कारण रात्रीची झोप अपुरी राहते, बाळाची काळजी घेण्यात त्रास होतो. प्रसूतीनंतर शरीराची थकलेली अवस्था आणि पोषणाची कमतरता या सर्व गोष्टी केसांच्या आरोग्यावर थेट परिणाम करतात. त्यामुळे, मऊसर जाणवणारे केस अचानक खडबडीत होऊ शकतात, कुरळे केस सैल होतात किंवा अजून घट्ट होतात.

प्रसूतीनंतर केसांच्या बदलांचा अनुभव प्रत्येक महिलेला वेगवेगळा असतो. काहींना फक्त केस कोरडे होणे किंवा थोडे कुरळे होणे एवढेच जाणवतं. तर काहींमध्ये सरळ केस कुरळे होणे, दाट केस पातळ होणे असे मोठे बदल दिसतात. हे सर्व बदल हार्मोन्स, अनुवंशिकता आणि आरोग्याच्या स्थितीवर अवलंबून असतात. बऱ्याचदा हे बदल कायमचे असतात साधारण सहा ते बारा महिन्यांच्या आत हार्मोन्स पुन्हा संतुलित होतात आणि केसांची वाढ व टेक्स्चर हळूहळू आधीसारखे होते.

तज्ज्ञांच्या मते, प्रसूतीनंतर केस गळणे किंवा टेक्स्चर बदलणे हे धोक्याचे लक्षण नाही. तर शरीराच्या नैसर्गिक प्रक्रियेचा भाग आहे. योग्य आहार, पुरेशी विश्रांती, व्यायाम आणि ताण कमी ठेवल्यास हे बदल लवकर सुधारू शकतात.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

natural process of hair changes after pregnancy
Silent Heart Attack: थकवा, पाठदुखी की सायलेंट हार्ट अटॅक? दुर्लक्ष केलं तर जीवावर बेतू शकतं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com