Easter Sunday 2023 : का साजरा केला जातो इस्टर संडे ? या दिवशी चर्चमध्ये काय केले जाते ?

Easter Morning : इस्टर संडे दरवर्षी गुड फ्रायडे नंतर दोन दिवसांनी रोजी साजरा केला जातो.
Easter Sunday 2023
Easter Sunday 2023Saam Tv
Published On

Easter Sunday History : ख्रिश्चनांच्या धार्मिक ग्रंथानुसार, इस्टर संडे हा प्रभु येशूच्या पुनरुत्थानाच्या निमित्ताने साजरा केला जातो. इस्टर संडे दरवर्षी गुड फ्रायडे नंतर दोन दिवसांनी रोजी साजरा केला जातो.

इस्टर संडेचा सण रविवार, 9 एप्रिल 2023 रोजी साजरा केला जाईल. हा सण येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावर खिळल्यानंतर त्याच्या पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ साजरा (Celebrate) केला जातो. ईस्टर संडेशी संबंधित अनेक मनोरंजक तथ्ये आहेत, ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे, म्हणून आज आम्ही तुम्हाला इस्टर संडेच्या महत्वाच्या गोष्टींबद्दल सांगणार आहोत, जे प्रत्येकाला माहित असले पाहिजे

Easter Sunday 2023
Corn Methi Malai Recipe : सतत उकडलेले कॉर्न, मेथीची भाजी खाऊन कंटाळले ? मग डिनरला ट्राय करा कॉर्न मेथी मलाई, पाहा रेसिपी

1. इस्टर संडे का साजरा केला जातो ?

जगभरातील (World) अनेक ख्रिश्चन विशेष चर्च सेवा, संगीत, मेणबत्ती, फुले आणि चर्चच्या घंटांनी इस्टर साजरा करतात. फिलीपिन्स आणि स्पेन सारख्या काही देशांमध्ये इस्टर मिरवणुका काढल्या जातात. बरेच ख्रिश्चन इस्टरला चर्च वर्षातील सर्वात मोठी मेजवानी मानतात. ख्रिश्चन धर्मानुसार, येशू ख्रिस्ताचे स्मरण करण्याचा हा आनंदाचा आणि उत्सवाचा दिवस आहे.

2. इस्टरला इस्टर का म्हणतात?

येशूला मेरी मॅग्डालीनच्या थडग्यात पुरण्यात आले आणि जेव्हा ते 14 एप्रिल रोजी उघडण्यात आले तेव्हा ते रिकामे होते. एका देवदूताने त्याला सांगितले की येशू उठला आहे. तेव्हापासून या दिवसाला इस्टर म्हणतात.

Easter Sunday 2023
Food Avoid In Summer For Kids : उन्हाळ्यात 'हे' पदार्थ मुलांना खाऊ घालू नका...अन्यथा होऊ शकते गंभीर समस्या

3. यादिवशी काय केले जाते ?

  • प्रभू येशूच्या पुनरुत्थानाच्या आनंदात सर्वजण चर्चमध्ये जमतात आणि विशेष प्रार्थना करतात.

  • या दिवशी प्रभू येशूच्या स्मरणार्थ चर्चमध्ये मेणबत्त्या प्रज्वलित केल्या जातात.

  • लोक चर्चमध्ये बायबल वाचतात.

  • प्रभु येशूच्या पुनरुत्थानाच्या आनंदात एकमेकांचे अभिनंदन करा.

  • मान्यतेनुसार, अंडी (Eggs) हे नवीन जीवन आणि उत्साहाचे प्रतीक मानले जाते. म्हणूनच लोक अंडी वेगवेगळ्या प्रकारे सजवतात. यासोबतच अंडीही एकमेकांना भेट दिली जातात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com