Health tips : पाणी बसून का प्यावे ? त्याचा आपल्या आरोग्याला कसा फायदा होतो ? आयुर्वेदाने सांगितले कारण

पाणी बसून प्यायल्याने शरीराला कसा फायदा होतो हे जाणून घ्या
Benefits of water, Why drink water sitting down
Benefits of water, Why drink water sitting downब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
Published On

मुंबई : आपण आपल्या खाण्यापिण्याच्या बाबतीत अधिक जागरुक असतो. आपल्या आहारात कोणत्या गोष्टी आपण खायला हव्यात याची पुरेपूर माहिती आपल्याला असते.

हे देखील पहा -

आयुर्वेदानुसार आपल्याला अनेक गोष्टींचा फायदा होतो. खाण्यापिण्याच्या बाबतीत आपण विशेष काळजी घेतली की, आरोग्यासंबंधित अनेक समस्या आपल्यापासून दूर राहू शकतात. परंतु, याचे पालन केल्यास आपल्याला अनेक आजारांना तोंड द्यावे लागू शकते. बऱ्याचदा आपल्याला दूध उभे राहून व पाणी बसून प्यायला सांगितले जाते जाणून घेऊया त्यामागचे नेमके कारण काय आहे ते -

१. आयुर्वेदानुसार दूध (Milk) हे शक्तीवर्धक आहे. यात शरीराला थंड, वात आणि पित्तसारख्या आजारांपासून दूर राहण्यास मदत होते. यामुळे आपल्या सकाळी किंवा रात्री झोपण्यापूर्वी दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. उभे राहून दूध प्यायल्याने आपल्याला गुडघे दुखीचा त्रास उद्भवणार नाही, स्नायूंसाठी ते अधिक फायदेशीर ठरेल तसेच कर्करोगाचा धोका कमी होतो, हृदयरोग आणि उच्च रक्तदाबापासून संरक्षण होते, तसेच ते दूधामुळे शरीरातील कॅल्शियम वाढून डोळ्यांसाठी आणि त्वचेसाठी फायदा होतो.

Benefits of water, Why drink water sitting down
दिवसभरात पाणी किती प्रमाणात प्यायला हवे? पाणी प्यायल्यामुळे शरीराला नेमका फायदा कसा होतो?

२. आयुर्वेदानुसार उभे राहून पाणी (Water) प्यायल्याने अन्ननलिकांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा थांबला जातो. ज्याचा परिणाम आपल्या फुफ्फुसांवर व हृदयावर होतो. याशिवाय पाणी उभे राहून प्यायल्याने पोटाच्या खालील भागात दाब निर्माण होऊन आपल्या आतील अवयवांचे नुकसान होते. यासवयीमुळे आपल्याला सांधेदुखी व हर्नियासारखे आजार होऊ शकतात. पाणी एका दमात प्यायल्याने आपल्याला अॅसिडीटी, गॅस व ढेकर येणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. पाणी बसून प्यायल्याने ते आपल्या शरीरातील अनेक पेंशीपर्यंत त्याचा पुरवठा व्यवस्थित रित्या करते. आपल्या शरीराला आवश्यक तितके पाणी ते शोषून घेऊन ते उर्वरित पाणी विषारी पदार्थांमार्फत बाहेर टाकते. तसेच रक्त शुध्दी करणास याचा फायदा होतो.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com