
Short Height Girls : प्रत्येकजणाला आपल्या जोडीदाराकडून काही अपेक्षा असतात. प्रामुख्याने मुलं आपली पार्टनर कशी असावी अशी स्वप्न बघत असतात. मुलांना गर्लफ्रेंड, बायको ही त्यांच्यापेक्षा कमी उंची असणे पसंत असते. असंख्य मुलांना कमी उंची असलेल्या मुली आवडतात. किंचित खोटी वाटणारी ही गोष्ट एका रिसर्चमध्ये सिद्ध झाली आहे. दरम्यान हा रिसर्च काय आहे, तो कोणी केला आणि रिसर्चमध्ये नक्की काय समोर आलं हे सविस्तरपणे जाणून घेऊयात.
२०१५ मध्ये दक्षिण कोरियामध्ये कोंकुक विश्वविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. किताए सोहन यांनी एक रिसर्च केला होता. या रिसर्च अंतर्गत त्यांनी ७८५० महिलांशी संपर्क केला. यात महिला, त्यांचे जोडीदार आणि त्यांच्या खासगी जीवनावर अभ्यास करण्यात आला. यातून 'महिला आपल्यापेक्षा जास्त उंची असलेल्या पुरुषांसोबत असताना अधिक खुश होत्या' असा निष्कर्ष निघाला. तसेच 'पुरुषांना, मुलांना त्यांच्यापेक्षा कमी उंची असणाऱ्या मुली आवडतात' असे स्पष्ट झाले. रिसर्चला दहा वर्षे झाली असली तरीही मुलांच्या आवडीमध्ये बदल न झाल्याचे म्हटले जात आहे.
मुलांना कमी उंचीच्या मुली क्यूट वाटतात. जेव्हा एक मुलगा त्याच्या तुलनेमध्ये कमी उंची असलेल्या मुलीकडे पाहतो, तेव्हा तिचे संरक्षण करण्यासाठी अॅक्टिव्ह होतो. तिची काळजी आपल्याला घ्यायची आहे असा विचार त्याच्या मनात येतो. प्रामुख्याने क्यूटनेट फॅक्टरमुळे मुलं ही त्यांच्यापेक्षा कमी उंची असणाऱ्या मुलींकडे आकर्षित होतात, त्यांच्या प्रेमात पडतात. मुलींची प्रत्येक गोष्ट क्यूट वाटते.
मिठी मारताना कमी उंचीमुळे मुली मुलांच्या छातीपर्यंत पोहोचतात. अशा वेळी त्यांना मुलांच्या हृदयाचे ठोके ऐकायला येतात. ही गोष्ट मुलांना आवडते. मिठी मारताना मुलींना सुरक्षितेता वाटते, तर मुलांना आपण शक्तिशाली आहोत असे वाटते. आपल्या पार्टनरला आपली किंमत असावी असे प्रत्येक मुलाला वाटत असते. याकारणामुळेही मुलं कमी उंची असणाऱ्या मुलींकडे आकर्षित होतात असे म्हटले जाते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.