Eye Shadow: डोळ्यांच्या सौंदर्य वाढवण्यासाठी आयशॅडो लावण्याची योग्य पद्धत आणि टिप्स

Eye Shadow Applying Tips: डोळ्यांचे सौंदर्य वाढवण्यासाठी आयशॅडोचा चुकीचा वापर केल्यास तुमचा लुक खराब होऊ शकतो. अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला आयशॅडो लावण्याची योग्य पद्धत सांगणार आहोत.
Eye Shadow Applying Tips
Eye Shadow Applying Tipsyandex
Published On

मेकअप हा केवळ सौंदर्यवृद्धीच नव्हे तर महिलांच्या आत्मविश्वास वाढवण्याचा एक प्रभावी मार्ग आहे. त्यामुळेच महिला ऑफिसला जाण्यापासून ते पार्टीमध्ये ग्लॅमरस दिसण्यासाठी मेकअपला प्राधान्य देतात. योग्य पद्धतीने केलेला मेकअप केवळ लुक वाढवतोच, पण व्यक्तिमत्त्वातही बदल घडवतो. मात्र, चुकीच्या पद्धतीने वापरल्यास तो लुक बिघडू शकतो.

विशेषतः डोळ्यांचा मेकअप करण्याचा विचार केला तर तो अनेक महिलांसाठी आव्हानात्मक ठरतो. डोळ्यांच्या मेकअपमध्ये आयशॅडो लावणे महत्त्वाचे असूनही ते कठीण वाटते. आयशॅडो हे डोळ्यांना आकर्षक लुक देण्यासाठी पापण्यांवर लावले जाणारे एक कॉस्मेटिक उत्पादन आहे. हे वेगवेगळ्या रंगांमध्ये, पोतांमध्ये आणि फिनिशमध्ये उपलब्ध आहे, ज्यामुळे प्रत्येक व्यक्तीला हवे तसे लुक तयार करता येतो.

आयशॅडोचा योग्य पद्धतीने वापर केल्यास तुमच्या डोळ्यांचा लुकच नव्हे तर तुमचा चेहराही अधिक उठावदार आणि आकर्षक होतो. त्यासाठी योग्य रंगाची निवड, ब्लेंडिंगची पद्धत आणि ते लावण्याची शैली महत्त्वाची आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून आयशॅडो कसा लावावा याचे काही सोपे उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, ज्यामुळे तुमचा डोळ्यांचा मेकअप अधिक सहज आणि परिपूर्ण होईल. योग्य तंत्र जाणून घेतल्यास मेकअप करण्याचा अनुभवही अधिक आनंददायक ठरतो.

Eye Shadow
Eye ShadowYandex

योग्य शेड निवडा

तुमच्या त्वचेच्या टोन आणि कपड्यांच्या रंगाला अनुरूप अशी आयशॅडोची शेड निवडणे महत्त्वाचे आहे. दिवसा हलक्या आणि नैसर्गिक शेड्स उत्तम दिसतात, तर रात्रीसाठी गडद व चमकदार रंग योग्य ठरतात. हिरवा, निळा किंवा इतर ठळक रंग निवडताना त्याचा समतोल राखा, जेणेकरून तुमचा लुक आकर्षक आणि सुसंवादी दिसेल. योग्य शेड्सचा वापर तुमच्या लुकला नवा परिमाण देतो.

Eye Shadow
Eye ShadowYandex

प्राइमर वापरा

आयशॅडो लावण्यापूर्वी डोळ्यांवर प्राइमर लावल्यास, आयशॅडो अधिक काळ टिकतो आणि क्रिझ होण्यापासून संरक्षण मिळते. प्राइमरमुळे शेड्सचे रंग अधिक उठून दिसतात आणि त्यांचा प्रभाव अधिक ठळक होतो. तसेच, प्राइमर डोळ्यांचा मेकअप नैसर्गिक आणि परिपूर्ण दिसण्यासाठी उपयुक्त ठरतो. त्यामुळे आयशॅडो लावण्यापूर्वी प्राइमरचा वापर करणे अत्यावश्यक आहे.

Eye Shadow
Eye ShadowYandex

आयशॅडो नीट मिक्स करा

रंगांमध्ये कठोर रेषा येऊ नयेत यासाठी ब्रशचा योग्य वापर करा आणि हलक्या हाताने मिसळा. जेव्हा एकापेक्षा जास्त शेड्स वापरत असाल, तेव्हा त्या नीट मिसळा. यामुळे शेड्स एकमेकांमध्ये उत्तम प्रकारे घालमिल होऊन एक नैसर्गिक आणि सुसंगत लुक तयार होईल. यामुळे डोळ्यांचा मेकअप अधिक परिपूर्ण आणि आकर्षक दिसेल.

Eye Shadow
Eye ShadowYandex

तुमच्या डोळ्यांचा आकार लक्षात ठेवा

आयशॅडो लावताना डोळ्यांच्या आकारानुसार योग्य पद्धतीने शेड्स वापरा. डोळे मोठे आणि उजळ दिसवण्यासाठी बाहेरील कोपऱ्यांवर गडद शेड आणि आतील कोपऱ्यांवर हलका शेड लावा. स्मोकी आय लुक तयार करताना डोळ्यांच्या बाहेरील कोपऱ्यांवर अधिक लक्ष द्या, जेणेकरून डोळे गडद आणि आकर्षक दिसतील. यामुळे तुमचा मेकअप अधिक तीव्र आणि परफेक्ट दिसेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com