PM Modi Kumbh Snan: शाही स्नानासाठी पंतप्रधान मोदींनी ५ फेब्रुवारीचाच दिवस का निवडला? काय आहे आजच्या दिवसाचं महत्त्व?

PM Modi Takes Holy Bath In Triveni Sangam On 5th February: इतक्या महत्त्वाच्या तारखा सोडून पंतप्रधान मोदी यांनी आजच्याच दिवशी म्हणजे ५ फेब्रुवारीचाच दिवस का निवडला? पंतप्रधान मोदींनी या दिवसाची निवड का केली हे पाहूयात.
PM Modi Kumbh Snan
PM Modi Kumbh Snansaam tv
Published On

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रयागराजमध्ये कुंभ स्नानाचा अनुभव घेतला. महाकुंभ मेळ्यात आतापर्यंत अनेक दिग्गजांनी स्नान केलं आहे. महाकुंभ मेळ्यात पंतप्रधान मोदी पोहोचल्यानंतर त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत बोटीतून प्रवास केला. यावेळी त्यांनी त्रिवेणी संगमाला भेट दिली. या ठिकाणी त्यांनी पवित्र स्नान केले.

मात्र तुमच्या मनात विचार आला का, इतक्या महत्त्वाच्या तारखा सोडून पंतप्रधान मोदी यांनी आजच्याच दिवशी म्हणजे ५ फेब्रुवारीचाच दिवस का निवडला? पंतप्रधान मोदींनी या दिवसाची निवड का केली हे पाहूयात.

१३ जानेवारीपासून कुंभमेळ्याला सुरुवात झाली आहे. या कुंभमेळ्यामध्ये आतापर्यंत अनेकांना शाही स्नान केलं आहे. यामध्ये बॉलिवूड कलाकार, नेते मंडळी यांचाही समावेश आहे. तर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्नान केलं.

आजचा दिवस का निवडला?

पंतप्रधानांनी, मौनी अमावस्येचे सर्वात महत्त्वाचं शाही स्नान, वसंत पंचमी आणि इतर महत्त्वाचे स्नान सोडून आज म्हजणेच ५ फेब्रुवारी हा दिवस कुंभस्नानासाठी का निवडला? असा प्रश्न अनेकांच्या आहे. याचं उत्तर म्हणजे आज माघ महिन्यातील गुप्त नवरात्रीतील अष्टमीची तिथी आहे. धार्मिक दृष्टीकोनातून हा अत्यंत शुभ दिवस मानला जातो.

PM Modi Kumbh Snan
Maha Kumbh Mela: पीएम मोदी प्रयागराजच्या दौऱ्यावर, कुंभमेळ्यात सहभागी होत करणार गंगास्नान

शास्त्रानुसार, तपश्चर्या, ध्यान तसंच साधना करणं अतिशय पुण्याचं काम मानलं जातं. महाभारताच्या युद्धात बाणांच्या शय्येवर पडलेल्या भीष्मांनी सूर्यदेवाच्या उत्तरायण काळाची आणि शुक्ल पक्षाची प्रतीक्षा केली होती. असं म्हणतात की, ज्यावेळी ही शुभ तिथी आली तेव्हा पितामह भीष्मांनी आपले प्राण सोडले होते. त्यानंतर त्यांना मोक्ष प्राप्त झाला.

PM Modi Kumbh Snan
Maha Kumbh Mela 2025: हातात-गळ्यात रूद्राक्षांची माळ अन् मंत्राचा जप; PM मोदींनी त्रिवेणी संगमावर केलं स्नान, पाहा VIDEO

शास्त्र काय सांगतं?

माघ महिन्यातील अष्टमी तिथीला पवित्र नद्यांमध्ये स्नान करून पितरांचं स्मरण करावं, असं शास्त्रामध्ये म्हटलं आहे. यावेळी पितरांच्या नावाने जल, तीळ, अक्षता, फळं अर्पण करावीत. यामुळे पितरांना मोक्ष मिळतो, असं मानण्यात येतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com