सध्या केस पांढरे होणे या समस्या वाढल्या आहेत. त्यात तुम्ही बाहेरचे विकत रंग घेवून केस काळे केले तर, तुमचे केस जास्त प्रमाणात गळतात. मात्र तुमच्या लूकला पांढरे केस शोभत नसतील तुम्हाला केस काळे करण्यासाठी बाहेरचे रंगच वापरावे लागतात. त्यात वेगवेगळ्या केमिक्सचा वापर केला जातो. याचे दुष्परिणाम असतात. जर तुम्हाला नैसर्गिक पद्धतीने केस काळे करायचे असतील तर तुम्ही पुढील उपाय करु शकता.
कढीपत्त्याचा वापर
तुम्हीला माहीतच असेल हा आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर असतो. त्याने आपले केस गडद काळ्या रंगाचे होतात. याचा वापर पुढील पद्धतीने तुम्ही करु शकता.
याचा वापर पुढील पद्धतीने तुम्ही करु शकता.
सर्वप्रथम कढीपत्याची पाने स्वच्छ धुवून घ्या. मग एका लहान पातेल्यार खोबरेल तेल आणि कढीपत्त्याची पाने गरम करुन घ्या. पानं काळा झाली की गॅस बंद करा. मग ते तेल गाळून तुम्ही रोजच्या वापरासाठी वापरु शकता.
लिंबाचा रसाचे केसांसाठी फायदे
लिंबाच्या रसात व्हिटॅमिन आणि खनिज भरपूर प्रमाणात असते. त्याने तुमचे केस झपाट्याने वाढू शकतात. त्यातसोबत केसांचा मॉइश्चरपणा जपण्यासाठी तुम्ही खोबरेल तेलाचा वापर करु शकता.
याचा वापर पुढील पद्धतीने तुम्ही करु शकता.
खोबरेल तेल आणि लिंबाचा रस दोन्ही समान मापाने घ्या. आता त्याचे मिश्रण करुन केसांना लावू शकता. ३०मिनिटांनी तुम्ही केस स्वच्छ पाण्याने धुवू शकता.
आवळ्याचे केसांसाठी फायदे
पांढरे केस कमी करण्यासाठी आवळा खूप फायदेशीर ठरु शकतो. यात व्हिटॅमिन सी, अॅंटी-ऑक्सिडेट्स आणि फायबर्स असतात. यासाठी आवळा केसांना न लावता, फक्त त्याचे सेवन केले तर तुमचे केस पांढरे होणे बंद होतील.
कोरा चहा
कोरा हा आरेग्यासाठी खूप फायदेशीर असतो. तसेच काळ्याचहाने केसांचा काळेपणा वर्षानुवर्षे टिकून राहतो.
चहाचा वापर पुढील पद्धतीने तुम्ही करु शकता.
तुम्ही कोरा चहा नेहमीसारखा तयार करा आणि तो थंड झाल्यावर केसांना लावा. तासाभराने तुम्ही केस धुवा. याचा वापर तुम्ही आठवड्यातून दोनदा करु शकता.