Raw vs Dry Coconut : नारळ की शहाळं आरोग्यासाठी उत्तम आणि जास्त उपयोगी काय?

Which Coconut is Better : नारळ खात असाल किवा शहाळ्यातील पाणी आणि मलाई खात असाल, तर यातील जास्त हेल्थी काय आहे? असा प्रश्न तुमच्याही मनात येत असेल. त्याच बाबत आज माहिती जाणून घेणार आहोत.
Which Coconut is Better
Raw vs Dry CoconutSaam TV
Published On

हेल्थी फूड डायेटमध्ये विविध पदार्थांसाह नारळ पाण्याचा हमखास समावेश होतो. नारळ पाण्यात जास्त प्रमाणात प्रोटीन असते. अनेक महिला जेवणात विविध पदार्थ बनवताना त्यात नारळाचं वाटण सुद्धा मिक्स करतात. आता तुम्ही देखील नारळ खात असाल किंवा शहाळ्यातील पाणी आणि मलाई खात असाल, तर यातील जास्त हेल्थी काय आहे? असा प्रश्न तुमच्याही मनात येत असेल. त्याचबाबत आज माहिती जाणून घेणार आहोत.

Which Coconut is Better
Coconut Water Benefits : उन्हाळ्यात नारळाचे पाणी पिणे आरोग्यदायी; जाणून घ्या फायदे

सुकलेला नारळ

सुकलेला नारळ चवीला ओल्या नारळापेक्षा फार वेगळा लागतो. ओल्या नारळाची चव गोड असते. तसेच त्याची मलाई सहज चावून खाता येते. तर सुकलेल्या नारळाचं असं नसतं. नारळ सुकल्यावर थोडा कडक होतो. कडक नारळ जास्तवेळ चावून खावा लागतो. शिवाय यामध्ये पाणी नसते. त्यामुळे शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी सुक्क्या नारळाचा उपयोग योत नाही.

नारळ सुकल्यावर त्यातील तेल आणि कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं. तसेच सुकलेल्या नारळात जास्त कॅलरी आणि फायबर असल्याने याचे जास्त सेवन केल्यास शरिरातील अतिरिक्त चर्बी वाढत जाते. सुकलेल्या नारळाचा फायदा म्हणजे हा नारळ घरात कितीही दिवस स्टोअर करता येतो. मात्र त्यासाठी यामध्ये प्रिजर्व्हेट वापरलं जातं ते आरोग्यासाठी चांगलं नसतं.

ओला नारळ (शहाळं)

शहाळं आरोग्यासाठी जास्त प्रमाणात फायदेशीर आहे. शहाळं खाल्ल्याने आपल्याला यातून मोठ्याप्रमाणात व्हिटॅमीन मिळतात. प्रोटीन डायेट करत असाल तर आहारात शहाळ्याचा समावेश करा. शहाळ्यामध्ये कार्बोहायड्रेट कमी प्रमाणात असतं. तसेच शरिरात पाण्याचं प्रमाण वाढतं आणि शरिर हायड्रेट राहतं.

ओला नारळ vs सुकलेला नारळ

सुकलेल्या नारळात जास्त प्रमाणात मॉश्चराईजर नसतं. ताज्या नारळापेक्षा सुकलेल्या नारळामध्ये दुप्पट फॅट आणि कॅलरी असतात. सुकलेला नारळ जास्त काळ टिकतो. ओला नारळ जास्त वेळ आहे तसाच राहत नाही. मात्र आरोग्यासाठी फायदेशीर कोणता असा विचार केल्यास ओला नारळ आपल्या आरोग्यासाठी जास्त उत्तम आहे.

टीप : ही फक्त सामान्य माहिती आहे. साम टिव्ही या माहितीचं समर्थन करत नाही.

Which Coconut is Better
Benifits of Coconut Oil: स्वयंपाकापासून ते सौंदर्य खुलवण्यापर्यंत...; नारळाच्या तेलाचे फायदे ऐकून व्हाल थक्क

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com