Cooking Tips : ऑमलेट बनवताना पॅनला चिकटते ? या 3 सोप्या स्टेप फॉलो करा

Benefits Of Eggs : आपण भारतीय फक्त नाश्त्यातच नाही तर दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणातही अंडी आवडीणे खातो.
Cooking Tips
Cooking TipsSaam Tv

Kitchen Hacks : संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे... अंडी आरोग्यासाठी खूप महत्त्वाची मानले जातात. आपण भारतीय फक्त नाश्त्यातच नाही तर दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणातही अंडी आवडीणे खातो.

आपण अंडी (Eggs) वेगवेगळ्या प्रकारे तयार करू शकतो. आपण अंड्यांपासून ऑम्लेट, भाजी, करी, उकडलेले अंडे तयार करू शकतो, जे बनवायलाही खूप सोपे आहे. परंतु, अंडी जास्त शिजू नयेत. अंडी जास्त शिजल्यावर त्यातील सर्व पोषक तत्व नष्ट होतात. कधीकधी अंडी पॅनच्या तळाशी चिकटते.

Cooking Tips
Kitchen Hacks : फ्रीजमध्ये ठेवलेले पीठ घट्ट किंवा खराब होते? 'या' टिप्स फॉलो करा...

जर तुमच्यासोबतही असे होत असेल तर आज आम्ही तुमच्यासोबत असे काही हॅक शेअर करत आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही बनवलेल ऑमलेट कधीची फ्राय पॅनला चिकटणार नाही.

1. अंडी तळण्यासाठी नेहमी नॉन-स्टिक पॅनचा वापर केला पाहिजे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. अंडी नॉन-स्टिक पॅनला चिकटत नाही, पण अंडी चिकटत असली तरी पॅनच्या तापमानाकडे लक्ष द्या. पॅन जास्त गरम होणार नाही आणि गॅस मंद आचेवर ठेवा. अन्यथा, अंडी खालून जळतील आणि वरून कच्चे राहतील.

Cooking Tips
Kitchen Tips : घाणेरड्या चहा गाळणीला मिनिटांत करा साफ, फक्त 'या' टिप्स फॉलो करा

2. तरीही अंडी चिकटत असतील तर आपल्याला फक्त गॅसवर पॅन ठेवावे लागेल आणि मंद आचेवर गरम होऊ द्यावे लागेल. पॅन गरम झाल्यावर त्यात चिमूटभर मीठ टाका आणि नंतर अंडी घाला. असे केल्याने, अंडी चिकटणार नाही आणि हवे तसे ऑमलेट बनवता येईल

3. टेस्टी ऑमलेट बनवायचे असले तर अंडी शिजवण्यासाठी तेलाऐवजी (Oil) बटरचा वापर करा. जेव्हा तुम्ही हे करता तेव्हा तुमच्या अंड्याच्या रेसिपीला क्रीमी चव येते आणि त्याची चव अनेक पटींनी वाढते. तुमच्या आवडीनुसार तुम्ही सॉल्टेड किंवा अनसाल्टेड बटर निवडू शकता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com