WhatsApp Hack Alert : लिंकवर क्लिक न करता तुमचे व्हॉट्सअ‍ॅप होऊ शकते हॅक, काय आहे 'झिरो-क्लिक हॅक'? वाचा

WhatsApp Hack Attack Alert : जगातील विविध देशांमधील यूजर्सचे व्हॉट्सअ‍ॅप हॅक करण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली आहे. यानुसार, कोणत्याही लिंकवर क्लिन न करताही व्हॉट्सअ‍ॅप हॅक होऊ शकते असे म्हटले जात आहे.
WhatsApp Hack Alert
WhatsApp Hack AlertSaam Tv
Published On

WhatsApp Hack Alert : जगभरातील अनेक देशांमधील व्हॉट्सअ‍ॅप यूजर्सवर एका स्पायवेयर हल्ला झाला आहे. इटलीमध्ये सात ते आठ यूजर्सचे व्हॉट्सअ‍ॅप हॅक झाले होते. त्यानंतर त्या देशाने या संदर्भात तपास करायला सुरुवात केली. पॅरागॉन सॉल्यूशन्स या इस्राईलच्या सर्विलन्स कंपनीशी निगडीत स्पायवेयरचा वापर करुन पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि सिव्हिल सोसायटी सदस्यांना लक्ष्य करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

पॅरागॉन स्पायवेअर कंपनी विविध देशांना स्पायवेयर सिस्टीम विकते. राष्ट्रीय सुरक्षा आणि गुन्हेगारीवर मात करण्यासाठी या स्पायवेअरचा वापर केला जातो. या स्पायवेअरमुळे काही यूजर्सचे डिव्हाइस हॅक केल्याचा दावा व्हॉट्सअ‍ॅपने केला आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या अधिकाऱ्यांनी रॉयटर्सला या संदर्भात माहिती दिली. तब्बल ९० यूजर्सचे व्हॉट्सअ‍ॅप हॅक करण्याचा प्रयत्न केल्याचे कंपनीने रॉयटर्सला सांगितले.

झिरो-क्लिक हॅक म्हणजे काय?

यूजर्सचे व्हॉट्सअ‍ॅप हॅक करण्यासाठी पॅरागॉन कंपनीच्या स्पायवेअरचा वापर करण्यात आला. याचा अर्थ यूजरने कोणत्याही लिंकवर क्लिक न करताही त्याचे व्हॉट्सअ‍ॅप हॅक केले गेले. झिरो-क्लिक अटॅक झाल्याने हॅकर्स कोणत्याही अडथळ्याशिवाय यूजर्सच्या मोबाइलमधील व्हॉट्सअ‍ॅप वापरु शकतात. यावरुन हा हल्ला किती भयानक आहे याचा अंदाज येतो.

WhatsApp Hack Alert
Rose Day: रोझ डे साजरा करायचा आहे? बजेट कमी आहे? 'या' आहेत भन्नाट आयडिया

व्हॉट्सअ‍ॅपच्या अधिकाऱ्यांनी हा झिरो-क्लिक अटॅक कोणावर करण्यात आला होता याची माहिती रॉयटर्सला देण्यास नकार दिला आहे. पण ज्यांनी हा हल्ला केला आहे, ते लोक वेगवेगळ्या देशांमध्ये आहेत. विशेषत: ते युरोपात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. द गार्डियनने हॅकर्सनी पत्रकार, नेते आणि सामाजिक कार्यकर्त्यांवर झिरो क्लिक अटॅक झाला होता असे म्हटले आहे.

WhatsApp Hack Alert
Beard Men: दाढी असलेले पुरुष मुलींना का आवडतात? काय आहे त्यामागील आकर्षणाचे गुपित

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com