Monsoon care tips, how to protect during flood, Flood Safety Tips
Monsoon care tips, how to protect during flood, Flood Safety Tipsब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Monsoon Tips: अतिवृष्टी किंवा पूर परिस्थिती आल्यास काय कराल ?

पावसाळा सुरू झाल्यावर अशी घ्या काळजी.
Published on

मुंबई : पावसाळा सुरू झाला की, सगळीकडे संततधार सुरु असते. सततच्या पावसामुळे सगळीकडे पाणी साचत त्यामुळे आपली कोंडी होऊ लागते.(how to protect during flood)

हे देखील पहा -

नुक्ताच पावसाळा सुरू झाला आहे. त्यामुळे सगळीकडे पाणी (Water) देखील साचते. अतिवृष्टीमुळे आपल्या घरात किंवा त्याच्या आसपास विज जाण्याचा किंवा पाणी घरात शिरण्याचा त्रास सुरू होतो. अशावेळी आपली बरेचशी कामे अडली जातात. अचानक आलेल्या पूर परिस्थितीला किंवा प्रशासनाने हाय अर्लट दिल्यावर अशावेळी आपण काय काळजी (Care) घ्यायला हवी ते पाहूया. (Monsson Tips in Marathi)

१. हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला असल्यास घरातून बाहेर जाणे शक्यतो टाळा.

२. बातम्यांमधून बाहेरील परिस्थितीचा अंदाज घ्या, जेणेकरून आपण वेळेत सावध होऊ शकाल. गरज असेल तर घराबाहेर पडा.

३. अशा वेळी कामानिमित्त बाहेर जात असाल तर औषधे, पाणी, खाऊ, एखाद जोड कपडे अवश्य सोबत ठेवा. तसेच गाडीत दोरी किंवा दोरखंड असू द्या.

Monsoon care tips, how to protect during flood, Flood Safety Tips
Hair care : मिस इंडिया सिनी शेट्टीच्या काळ्या- दाट केसांचे रहस्य काय ?

४. आपल्या भागात पुराचे पाणी वाढत असेल, तर अशावेळी दुर्लक्ष करू नका. घाबरून देखील जाऊ नका. शासकीय यंत्रणेकडे मदत मागा.

५. भिंती ओल्या झाल्या असतील, तर विजेची उपकरणे हाताळू नका. वायर उघडी असेल तर शॉक बसू शकतो. तसेच पाणी साचलेल्या भागातून येत असल्यास कोणत्याही ठिकाणी हात लावू नका.

६. अति मुसळधार पाऊस असेल तर झाडाखाली थांबू नका. तसेच विजेच्या खांबापासूनही दूर रहा.

७. मोबाइल- लॅपटॉप, पॉवर बँक यांसारख्या उपकरणांची तसेच घरातील इमर्जन्सी लॅम्प आदींच्या बॅटरी चार्ज करून ठेवा. सावधगिरी म्हणून घरात मेणबत्त्या, काडेपेटी ठेवा.

८. घरात कंदील अथवा तेलाचे दिवे वापरत असाल, तर केरोसीन वा तेल साठवून ठेवा. वीज गेल्यानंतर त्यांचा उपयोग करता येईल.

९. पावसाळ्यात आपल्या भागात पाणी घुसण्याची शक्यता असेल तर घरात अन्नधान्य, आठवडाभर पुरतील एवढ्या भाज्या फळे व बिस्किटे तसेच खाण्याचे पदार्थ व दुधाचा तसेच औषधांचा साठा करून ठेवा.

१०. महत्त्वाची कागदपत्रे ,औषधे, कपडे ,अंथरूण - पांघरूण तसेच खाद्यपदार्थ शक्यतो सुरक्षित व उंच जागी ठेवा. अशा वेळी विद्युत आणि गॅस उपकरणे व मुख्य स्विचेस बंद करा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com