Hair care : मिस इंडिया सिनी शेट्टीच्या काळ्या- दाट केसांचे रहस्य काय ?

लांब व दाट केसांसाठी हेअर स्पा कसा करावा ?
Hair spa, how to care your hair, hair care tips in Marathi
Hair spa, how to care your hair, hair care tips in Marathiब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : मिस इंडिया सिनी शेट्टी ला यंदा मिस इंडिया २०२२ चा ताज जाहिर करण्यात आला. तिच्या ऑफिशयल इंस्टाग्राम पेजवरुन तिने तिचे फोटो नुकतेच शेअर केले आहे. त्यात तिच्या लांब केसांची काळजी कशी घेतली याबद्दल सांगितले आहे. (how to care your hair)

हे देखील पहा -

आपण आपल्या केसांच्या (Hair) बाबतीत अधिक सक्रीय असतो. केसांची काळजी घेण्यापासून ते तिच्या वाढीपर्यंत आपण केसांसाठी अनेक तेल किंवा इतर प्रसाधानांचा वापर आपण करतो. आपले केस ड्राय व डिहाइड्रेट करण्यासाठी आपण हेअर स्पा करतो. तो कशाप्रकारे केला जातो हे पाहूया.(hair care tips in Marathi)

स्पा कसा केला जातो-

या हेअर स्पामध्ये शाम्पू, कंडिशनर, हेअर मास्क आणि मसाज या चार गोष्टींचा समावेश केला जातो. या स्पामध्ये अँटिऑक्सिडंट असणारी प्रसाधने प्रमुख्याने वापरली जातात. यात आर्गन ऑइलचाही सर्वाधिक वापर केला जातो. तसेच हे तेल फॅटी अॅसिड आणि व्हिटॅमिन-ई (Vitamins) ने भरपूर असते, जे खराब झालेले केस दुरुस्त करण्यासाठी चांगले मानले जाते.

Hair spa, how to care your hair, hair care tips in Marathi
Pune: पर्यटकप्रेमींनो, पावसाळ्यात पुण्यातील या स्थळांना भेट द्या

चमकदार व मजबूत केसांसाठी -

हा स्पा खराब झालेले केस दुरुस्त करून पुन्हा नव्याने केस वाढण्यास मदत करते. याच अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे, ओमेगा यांसारखे घटक केसांना ताकद देतात आणि त्यांना निरोगी बनवतात. तसेच ते केसातील कोरडेपणा काढून टाकते आणि नैसर्गिकरित्या चमकदार बनवते. यासोबतच केसांचा पोतही गुळगुळीत होतो, त्यामुळे ते रेशमी दिसतात.

कोंड्यापासून सुटका कशी कराल -

या स्पा ट्रीटमेंटमुळे टाळूच्या कोरड्या भागात होणारा कोंडा नियंत्रित करता येतो व स्कॅल्पला स्वच्छ लुक मिळतो. कोरडे निर्जीव केस दुंभगण्याचा प्रयत्न करतात. हा स्पा केल्यामुळे कोंड्यापासून सुटका होते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com