मुंबई : पावसाळा म्हटलं की, निसर्गाचा आनंद घेण्यासाठी आपण बाहेर फिरण्याचा प्लॅन करत असतो. बाहेर फिरण्याचा प्लॅन करताना आपण महाराष्ट्रातील काही भागात पावसाचा व निसर्गाचा आनंद लुटू शकतो. (Places to visit in Pune)
हे देखील पहा -
आपल्यापैकी बऱ्याच जणांना फिरायला अधिक आवडते महिन्यातून, वर्षातून किंवा सुट्टीच्या दिवशी आपण फिरण्याचे प्लॅन बनवतो परंतु, फिरायला जाण्यापूर्वी आपल्या ते स्थळ जवळ हवे असते. त्यासाठी आपण पुणे शहराची निवड करु शकतो. भारताच्या (India) महाराष्ट्रात राज्यातील महत्त्वाचे शहर पुणे. या शहराच्या आत अनेक ऐतिहासिक घटना घडलेल्याला आपल्याला पाहायला मिळतात. पुण्यातील वातावरणाची बाब देखील वेगळी आहे. याचे मुख्य असे कारण हे फिरण्यासाठी सगळ्यात सुंदर शहर म्हणून ओळखले जाते. आपण देखील पुण्याला फिरण्याचा प्लॅन करत असू तर या पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या.
१. लोणावळा रेल्वे स्थानकापासून सुमारे २० किलोमीटर अंतरावर पावना लेक आहे. येथील सरोवराचा आकार व सभोवतालचे दृश्य हे विलोभनीय आहे. येथे आपल्याला कॅम्पिंग करण्याचा आनंद लूटता येतो. आपण आपल्या परिवारासोबत किंवा मित्र- मैत्रिणींसोबत या परिसराचा आनंद घेऊ शकतो.
२. एम्प्रेस गार्डन हे पुण्यातील सगळ्यात लोकप्रिय असे पिकनिक स्पॉट आहे. येथे आपल्याला अनेक प्रकारची फुले पाहायला मिळतात. या बागेमध्ये विविध प्रकारचे वृक्षांचे संगोपन केले जाते.
३. पुण्यात गेल्यानंतर आपण पार्वती हिल्सला नक्की भेट द्या. येथील सुंदर दृश्य हे आपल्या डोळ्यांचे पारणे फेडतात. येथे असणारे मंदिर हे पुरात्न असून याच्या चारही बाजू निसर्ग सौंदर्यांने नटलेल्या आहेत.
४. मुळशी धरण हा वाहते पाणी (Water), चारी बाजूंनी हिरवळ, गार वातावरण अशाप्रकारचा हा धरण आहे. याच्या आजूबाजूला अनेक धरणे आहेत ज्याचा आपण आनंद घेऊ शकतो.
५. शनिवार वाडा हा पुण्यातील ऐतिहासिकतेच्यादृष्टीने अधिक महत्त्वाचा मानला जातो. शनिवार वाड्याचे मुख्य प्रवेशद्वार दिल्ली दरवाजा या नावाने इतर दरवाजे गणेश, मस्तानी, जंभळ, खिडकी अशा नावांनी ओळखले जातात. याचे दृश्य अतिशय विलोभनीय आहे.
Edited By - Komal Damudre
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.