Career As Air Hostess: हवाई सुंदरी बनण्यासाठी शिक्षणाची अट किती ? प्रवेश, कोर्स फी, पगार किती ? जाणून घ्या सर्वकाही...

How To Choose career after 12th : नुकतीचे दहावी-बारावी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ही एक करिअरच्या दृष्टीने सुवर्ण संधी असू शकते.
Career in Air Hostess
Career in Air HostessSaam Tv
Published On

Best Career Options after HSC: एअर होस्टेस बनण्यासाठी हजारो मुलींचे स्वप्न असते. नुकतीचे दहावी-बारावी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ही एक करिअरच्या दृष्टीने सुवर्ण संधी असू शकते.

वाढत्या एव्हिएशन इंडस्ट्रीमुळे एअर होस्टेसची मागणीही वाढत आहे. इच्छा असून देखील अनेकांना योग्य माहिती न मिळाल्यामुळे हेअर होस्टेस बनण्याचे स्वप्न भंग पावते. आज आम्ही तुम्हाला एअर होस्टेस होण्यासाठी कोणती पात्रता (Eligibility) आवश्यक आहे आणि किती पगार आहे. हे सर्व सांगणार आहोत.

Career in Air Hostess
Career In Pilot : पायलट व्हायचं ? भारतीय वायुसेनेत किती मिळतो पगार ? शिक्षणाची पात्रता किती ?

1. एअर होस्टेस कोण बनू शकते ?

एअर होस्टेस होण्यासाठी, सर्वप्रथम किमान इंटरमिजिएट पास किंवा एव्हिएशनमध्ये पदवीधर असणे आवश्यक आहे. याशिवाय एअर होस्टेस ट्रेनिंग स्कूलमधून प्रशिक्षण घ्यावे. एअर होस्टेस होण्यासाठी शारीरिक मानक देखील विहित केलेले आहे. उमेदवाराची उंची (Height) किमान पाच फूट २ इंच असावी. शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असणे देखील महत्त्वाचे आहे. वय 17 ते 26 वर्षे दरम्यान असावे. तसेच अर्जाच्या वेळी अविवाहित असणे आवश्यक आहे.

Career in Air Hostess
Reasons Why You're Not Losing Weight : या 4 कारणांमुळे वजन होत नाही कमी...!

2. एअर होस्टेसची निवड कशी होते

एअरलाइन्स एअर होस्टेसच्या पदासाठी भरतीसाठी जाहिराती काढतात. लेखी चाचणी, गटचर्चा आणि वैयक्तिक मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाते.

3. कोर्स कोणता ?

एअर होस्टेस होण्यासाठी सर्टिफिकेट, डिग्री किंवा डिप्लोमा कोर्स करता येतो. हे अभ्यासक्रम बारावीनंतर करता येतात. प्रमाणपत्र आणि पदविका अभ्यासक्रमाचा कालावधी सहा महिने ते एक वर्षाचा असू शकतो. तर पदवी अभ्यासक्रम तीन ते चार वर्षांचा असतो.

Career in Air Hostess
Ashvini Mahangade Photoshoot : निळ्या साडीला लाल काठ, अश्विनीचा शोभून दिसतोय पेशवाई साज !

4. पगार (Salary)

नवीन एअर होस्टेसला सुरुवातीला सरासरी चार ते पाच लाख रुपये वार्षिक पगार मिळतो. पण जसजसा अनुभव वाढत जातो तसतसा तो 13 ते 15 लाखांपर्यंत पोहोचतो.

5. काम कसे असते ?

- प्रवाशांचे स्वागत करणे, प्री-फ्लाइट ब्रीफिंगमध्ये त्यांना त्यांच्या सीटवर मार्गदर्शन करते

- फ्लाइट दरम्यान प्रवाशांच्या प्रश्नांची उत्तरे देणे

- प्रवाशांना अन्न आणि पाणी पुरवणे

- फ्लाइट रिपोर्ट तयार करणे

- प्रवाशांना वैद्यकीय सेवा पुरवणे, आवश्यक असल्यास प्रवाशांना सुरक्षा प्रक्रियेबद्दल सूचना देते

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com