What Is Sleep Divorce : स्लीप घटस्फोट म्हणजे नेमकं काय ? अनेक तरुण जोडप्यांची पसंती, कसा होतो कपल्सला याचा फायदा

Couple Tips : दुसऱ्या कपल्सच्या तुलनेत चांगली हेल्थ लाईफ आणि रिलेशनशिप डेव्हलप करतात.
what is sleep divorce
what is sleep divorceSaam Tv

What Is Sleep Divorce : लग्नानंतर पार्टनर एकच बेड शेअर करतात. सोबतच दोघं एकमेकांना समजून घेण्यासाठी आणि रोमँटिक आठवणी ताज्या करण्यासाठी एकमेकांच्या सहवासात राहतात. अशातच त्यांना अनेकदा एकमेकांची मने समजून त्यासाठी वेळ मिळतो.

असे मानले जाते की जे नवरा बायको एकमेकांसोबत बेड शेअर करतात ते दुसऱ्या कपल्सच्या तुलनेत चांगली हेल्थ लाईफ आणि रिलेशनशिप डेव्हलप करतात. परंतु स्थितीनुसार काही अडचण झाल्यावर पती-पत्नीला वेगवेगळे झोपावे लागते.

what is sleep divorce
Relationship Tips : बायको नवऱ्याशी का खोट बोलते ? जाणून घ्या कारण

असं तेव्हा होतं जेव्हा तुमचा पार्टनर जोर जोरात घोरून झोपत असेल किंवा रात्रभर लाईट चालू ठेवून जागे राहत असाल. अशावेळी कपल्सला वेगवेगळे झोपणे सोयीचे वाटते. परंतु आता प्रश्न असा पडला आहे की, या प्रक्रियेला स्लिप घटस्फोट म्हणायचे का ?

जेव्हा कपल्स वेगवेगळे झोपतात तेव्हा त्या प्रक्रियेला स्लिप घटस्फोट म्हणतात. असं केल्याने त्यांना झोपेच्या समस्येपासून सुटकारा मिळतो. त्याचबरोबर चिडचिड करण्याएवजी सकाळी उठल्यावर फ्रेश फिल करतात.

what is sleep divorce
Relationship Tips : तुम्ही देखील काही दिवसांत लग्न करणार आहात ? तर 'या' टिप्स फॉलो करा, नात्यामध्ये टिकून राहिल गोडवा !

1. स्लीप घटस्फोट म्हणजे नेमके काय ?

स्लिप घटस्पोर्ट तेव्हा होतो जेव्हा, पार्टनर्स (Partner) सोबत तर राहतात पण, रात्री झोपताना एकमेकांसोबत झोपत नाहीत. त्यांना वेगवेगळ्या बेडरूममध्ये झोपण्यासाठी आवडते. परिस्थितीनुसार स्लीप घटस्फोट लॉन्ग टर्म किंवा काही वेळा पुरता देखील असू शकतो.

वास्तव्यात आपल्याला स्लीप घटस्फोटची गरज आहे, स्वस्त जीवनशैलीसाठी चांगली झोप घेणे अत्यंत गरजेचे असते. परंतु एका पार्टनरच्या झोपण्याच्या खराब सवयीमुळे उद्या पार्टनरची झोप बिघडू शकते. अशावेळी तुम्ही तुमच्या पार्टनरच्या झोपेच्या खराब सवयीन सोबत मिळतजुळत घेत असाल तर, तुम्ही स्लीप घटस्फोटचा विचार करणे चुकीचे नाही आहे.

what is sleep divorce
Relationship Tips : विवाहित नात्यात गोडवा आणण्यासाठी या टिप्स फॉलो करा

2. स्लीप घटस्फोट तुमच्या नात्यामध्ये (Relation) दुरावा येतो का ?

स्लीप घटस्फोटचा अर्थ असा नाही होत की तुमचं नातं प्रभावित आहे. वेगवेगळे झोपणे ही पार्टनरची चॉईस असते. स्लीप घटस्फोटचा अर्थ असा नाही की तुम्ही एकमेकांसोबत कधीच बेड शेअर करणार नाही, याचा अर्थ म्हणजे कोणत्याही डिस्टर्बन्स शिवाय चांगली झोप घेणे होय.

3. स्लीप घटस्फोटचे फायदे (Benefits) :

झोपेच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा करण्यासाठी स्लीप घटस्फोट अत्यंत फायदेशीर ठरते. कपल्सला त्यांचा पर्सनल स्पेस मिळतो. वेगवेगळ्या बिछान्यावर झोपल्यानंतर चांगली झोप लागते. हेल्दी रिलेशनशिपसाठी एकाच बेडवर झोपणे गरजेचे नाही. कपल्स एकमेकांसोबत न झोपता इंटिमेसी बनवून ठेवतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com