Silent Divorce: सायलेंट डिव्होर्स म्हणजे काय? घटस्फोटाआधीच तुटतं नातं; सायलेंट डिव्होर्सचे संकेत कोणते?

Silent Divorce And Its Early Signs: कधीकधी कायदेशीररित्या नाते संपण्याआधीच भावनेच्या पातळीवर नाते तुटतात, हे सायलेंट डिव्होर्सचे संकेत आहे. सायलेंट डिव्होर्स म्हणजे काय, याची वेगवेगळी संकेत कोणती, जाणून घ्या.
silent divorce
silent divorceyandex
Published On

सध्या सोशल मीडियाच्या ट्रेंडप्रमाणे नाते-संबंध यांच्याशी संबधित एक ट्रेंड सुरु आहे. याला सायलेंट डिव्होर्स असे म्हणतात. याचा अर्थ असा की, नातेसंबध कायदेशीररित्या संपण्याआधीच ते भावना आणि संभाषणाच्या पातळीवर तुटतात. पती-पत्नी एकाच छताखाली राहतात, परंतु त्यांच्यातील अंतर इतके वाढते की ते दोन अनोळखी व्यक्ती बनतात. सायलेंट डिव्होर्समुळे अनेक सुंदर नाते झटक्यात तुटतात. कायदेशीररित्या नातं संपण्याआधी सायलेंट डिव्होर्सची कोणती संकेत दिसतात, जाणून घ्या.

सायलेंट डिव्होर्सची संकेत कोणती?

संभाषणाचा अभाव

पूर्वी एकमेकांशी सर्व गोष्टी शेअर करणे, आता फक्त आवश्यक गोष्टींवरच चर्चा होणे किंवा गरज असल्यासच संवाद साधणे हे सायलेंट डिव्होर्सचे मुख्य संकेत आहे.

भावनिक अंतर

एकमेकांच्या दुःखात सामील न होणे. कोणताही चांगली किंवा वाईट बातमी असल्यास सर्वप्रथम आपल्या जोडीदाराला सांगण्याऐवजी तिसऱ्या व्यक्तीला सांगणे हे नात्यामध्ये आलेले भावनिक अंतराचे संकेत आहे.

silent divorce
Hair Colour: हेअर कलर करायला आवडतं? पण शरीरावर होणारे 'हे' गंभीर परिणाम वाचाच

शारिरीक स्पर्शाचा अभाव

नात्यामध्ये प्रेम,जवळीक आणि आपलेपण दाखवण्यासाठी मिठी मारणे किंवा हात पकडणे ही सामान्य बाब आहे, परंतु या गोष्टींच्या अभावामुळे नात्यामध्ये दुरावा निर्माण होतो.

वेगवेगळे जीवन जगणे

दोघे एकाच घरात राहूत असले तरीही आपल्या वेगळ्या जगात व्यस्त असणे, जसे की एखादी व्यक्ती चित्रपट पाहण्यात व्यस्त असते तर दुसरी व्यक्ती आपल्या मित्रांबरोबर व्यस्त असते.

वादांचा पूर्ण अभाव

जिथे पूर्वी क्षुल्लक वाद व्हायचे, तिथे आता शांतता आहे. याचा अर्थ असा की तुम्ही आता एकमेकांशी वाद घालण्याचा किंवा गोष्टी सोडवण्याचा प्रयत्नही करत नाही.

वेगळे होण्याचे स्वप्न पाहणे

जर तुम्ही या नात्यात नसता तर तुमचे आयुष्य कसे असते याबद्दल कल्पना करणे हे देखील सायलेंट डिव्होर्सचे संकेत आहे.

आदराचा अभाव

एकमेकांच्या मतांचा किंवा भावनांचा आदर न करणे. किंवा बोलताना एकमेकांना टोमणे मारणे हे सायलेंट डिव्होर्सचे संकेत आहे.

silent divorce
Google Calling Update: अचानक का बदलली फोन कॉलिंग स्क्रीन; नेमकं कशामुळे झालंय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com