Parkinson Disease : ११ वर्षांपासून पार्कीन्सशी लढणाऱ्या अॅनीची झुंज यशस्वी, हा आजार कसा होतो?

Parkinson Causes : शारीरिक हालचालींमध्ये येणारा अडथळा, मान आखडणे, शारीरिक अवयवांचा समन्वय साधण्यात अडचणी येत होत्या.
Parkinson Disease
Parkinson DiseaseSaam Tv

Parkinson Symptoms :

गेल्या ११ वर्षांपासून पार्किन्सन्स सिंड्रोम विरूद्ध लढा देणाऱ्या अॅनी निजलँडची झुंज यशस्वी ठरली आहे. शारीरिक हालचालींमध्ये येणारा अडथळा, मान आखडणे, शारीरिक अवयवांचा समन्वय साधण्यात अडचणी अशा समस्यांमुळे अॅनीच्या आयुष्यातील समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्या होत्या.

या आजारात कोणत्याही आधाराशिवाय चालणे कठीण असते. स्नायूमध्ये कडकपणा येणे, शारीरिक हालचालींमध्ये अनेक समस्यांचा सामना करावा लागत होतो ज्यामुळे तिची मान उजवीकडे अधिक प्रमाणात झुकलेली होती.

Parkinson Disease
Tea Side effects On Digestion: दिवसभरात २ पेक्षा जास्त वेळा चहा पिताय? होऊ शकतो पचनसंस्थेवर परिणाम

डॉ प्रदीप महाजन(रीजनरेटिव्ह मेडिसिन संशोधक आणि स्टेमआरएक्स बायोसायन्स सोल्यूशन्स इंडियाचे संस्थापक) सांगतात की, जेव्हा तिने स्टेमआरएक्स बायोसायन्स सोल्यूशनला भेट दिली तेव्हा तिच्या आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात झाली.

सर्वात आधी डिटॉक्सिफिकेशनपासून उपचार सुरु करण्यात आले ज्याद्वारे तिच्या शरीरातील विषारी द्रव्ये काढून टाकण्यात आली. त्यानंतर रिजनरेटिव्ह मेडिसिन्सचा वापर करण्यात आला. तिच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा दिसून आली. मानेच्या (Neck) हलचाली सुरु झाल्या,तिला तिच्या अवयांचा समन्वय साधता येऊ लागला आणि तिच्या स्नायूंमधील कडकपणा देखील दूर होऊ लागला. लेवोडोपा या औषधावरील तिचा प्रभाव कमी झाला. यावरुनच तिचे शरीर पुन्हा आहे त्या स्थितीत येत असल्याची खात्री झाली.

स्टेमआरएक्सच्या संपुर्ण टिमने यासाठी अतोनात प्रयत्न केले आणि त्यांनी तिला फेकल मायक्रोबायोटा ट्रान्सप्लांटेशन (एफएमटी) ची ओळख करून दिली, जी तिच्या आतड्याचा मायक्रोबायोटा वाढवणारी थेरेपी आहे. त्याच बरोबर अॅनीने न्यूट्रास्युटिकल्स सप्लिमेंटचा वापर सुरु केला. हळूहळू तिचा आत्मविश्वास वाढला आणि हे केवळ तिच्या शारीरिक हलचालींमधून दिसून येत होते. गोंधळत बोलणाऱ्या अॅनीची वाच्यता आणखी स्पष्ट झाली. तिच्या स्कील्समध्ये देखील सुधारणा झाली. अॅनी निजलँडची ही संघर्षमय कथा नक्कीच प्रेरणादायी ठरेल. स्टेमआरएक्स बायोसायन्स सोल्युशन्सच्या मदतीने तिला नव्याने आयुष्य (Life) जगता येत आहे.

Parkinson Disease
Ganesh Chaturthi 2023 : श्रीमंत दगडूशेठसमोर सामूहिक अथर्वशीर्ष पठण, ३५ हजार महिलांनी केली श्रीगणेशाची आराधना

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com