Lymphoma Awareness : लिम्फोमा म्हणजे काय? या कॅन्सरची लक्षणं आणि उपचार कसे असतात, जाणून घ्या

Lymphoma Awareness : १५ सप्टेंबर हा लिम्फोमा कॅन्सरच्या जनजागृतीचा दिवस ओळखला जातो. या दिवसाच्या निमित्ताने कोणती काळजी घेतली पाहिजे, हे जाणून घेऊया.
Lymphoma Awareness
Lymphoma Awarenesssaam tv
Published On

आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक प्रकारच्या कॅन्सरमध्ये वाढ होत असल्याचं दिसून येतील. गेल्या काही वर्षांमध्ये कॅन्सरचं प्रमाण वाढलं असून 30 ते 40 टक्के लिम्फोमा कॅन्सरचे रुग्ण आढळून येतात. १५ सप्टेंबर हा लिम्फोमा कॅन्सरच्या जनजागृतीचा दिवस ओळखला जातो. लिम्फोमा हा रक्‍ताच्या कॅन्सरचा दुसरा प्रकार असून यामध्ये 30-40 प्रकारचे लिम्फोमा आढळतात.

दरम्यान वेळीच या कॅन्सरची लक्षणं दिसून आली आणि त्यावर उपचार घेतले तर ते फायदेशीर ठरू शकतं. या कॅन्सरबाबत कोणती काळजी घेतली पाहिजे, हे जाणून घेऊया.

मुंबईतील फोर्टिस रूग्णालयातील हेमेटोलॉजी कंसल्टंट डॉ. हमजा दलाल यांनी सांगितलं की, लिम्फोमा हा एक असा कॅन्सर आहे जो लिम्फोसाइट्सवर परिणाम करतो. लिम्फोसाइट्स आपल्या शरीरातील संसर्गाशी लढण्याचं काम करतात आणि लिम्फ नोड्स, प्लीहा आणि शरीराच्या इतर भागांमध्ये आढळतात. लिम्फोमाचे दोन मुख्य प्रकार आहेत: हॉजकिन्स लिम्फोमा आणि नॉन-हॉजकिन्स लिम्फोमा.

वेळेवर निदान आणि उपचार घेतल्यानंतर या कॅन्सरमधून रूग्ण पूर्णपणे बरा होऊ शकतो.
डॉ. हमजा दलाल, फोर्टिस रूग्णालय

काय आहेत याची लक्षणं?

लिम्फोमाची लक्षणं भिन्न असू शकतात, जसे की बगलेत, पोटात, सांधा किंवा मान यांच्यामध्ये सूज येणं, ताप, खोकला, खूप थकल्यासारखे वाटणं, श्वास घेण्यास त्रास होणं आणि वजन कमी होणं इत्यादी. लिम्फोमाचा संशय आल्यानंतर ब्लड टेस्ट, पीईटी स्कॅन, लिम्फ नोड बायोप्सी आणि कधीकधी बोन मॅरो बायोप्सी यासारख्या करण्याचा सल्ला दिला जातो.

डॉ. दलाल पुढे म्हणतात, एकदा लिम्फोमाची खात्री झाली की, त्यावर सामान्यतः केमोथेरपी, इम्युनोथेरपी आणि रेडिएशन थेरपीने उपचार केले जातात. बहुतेक रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे होतात. तर काही रूग्णांना बोन मॅरो ट्रान्सप्लांट किंवा सीआर-टी सेल थेरपीसारख्या नवीन उपचारांची गरज भासू शकते.

Lymphoma Awareness
Postpone Periods Dates: सणासुदीला पुजेनिमित्त मासिक पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्या घेताय? प्रजनन क्षमतेवरही होतोय परिणाम

लिम्फोमा हा कॅन्सरचा एक प्रकार असून जो शरीराच्या रोगप्रतिकारक प्रणालीचा भाग असलेल्या लिम्फॅटिक प्रणालीमध्ये उद्भवतो. जेव्हा लिम्फोसाइट्स (पांढऱ्या रक्तपेशीचा एक प्रकार) नियंत्रणाबाहेर वाढतात आणि ट्यूमर बनतात तेव्हा ही समस्या वाढते.

काय आहेत लिम्फ नोड्सची लक्षणं?

लिम्फोमाच्या सामान्य लक्षणांमध्ये लिम्फ नोड्सची वेदनारहित सूज, सतत थकवा, वजन कमी होणं, ताप, रात्री घाम येणं आणि खाज सुटणं यांचा समावेश असू शकतो.

न्यूबर्ग सेहगल पॅथ लॅबचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य पॅथॉलॉजिस्ट डॉ कुणाल सहगल यांच्या सांगण्यानुसार, लिम्फोमासाठी उपचार हे कॅन्सरचा प्रकार आणि त्याच्या टप्प्यावर अवलंबून आहे. यामध्ये केमोथेरपी, रेडिएशन थेरपी, औषध थेरपी आणि काही प्रकरणांमध्ये स्टेम सेल प्रत्यारोपण यांचा समावेश होतो. जर तु्म्हाला ही लक्षणं दिसली तर वेळीच डॉक्टरांची मदत घेणं फायदेशीर ठेवणार आहे.

Lymphoma Awareness
बाप्पाचा आशीर्वाद आणि हृदय प्रत्यारोपण, तरूणाला मिळालं नवजीवन; १७ वर्षीय ब्रेनडेड तरूणामुळे ४ जणांना नवं आयुष्य!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com