Health Tips : तासंतास डेस्क वर्कमुळे होऊ शकतो कंबरेचा गंभीर आजार; वाचा लक्षणे आणि उपाय

Dead Butt Syndrome : तासंतास बसून काम करत असाल तर तुम्हालाही लवकरच डेड बट सिंड्रोम हा आजार होऊ शकतो. यातून बाहेर कसं पडायचं याची माहिती आज जाणून घेणार आहोत.
Dead Butt Syndrome
Health TipsSaam TV
Published On

काही व्यक्ती तासंतास डेस्क वर्क करतात. सध्याच्या लाइफस्टाइलमध्ये अनहेल्दी जेवण आणि आरोग्यास हानिकारक कामे केली जातात. यामध्ये एकाच जागी तासंतास बसून काम करण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यामुळे याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. तासंतास इच्छा नसतानाही बसून रहावे वाटते. त्यामुळे सांधे दुखी वाढली आहे. अगदी तरुण वयात व्यक्ती आजारी पडत आहेत.

Dead Butt Syndrome
Symptoms of Diabetes: शरीरात 'हे' बदल दिसून आले तर सावधान; मधुमेहाची लक्षणं असू शकतात!

सतत एकाच जागी बसून काम केल्याने डेड बट सिंड्रोम हा आजार होतो. आता हा आजार नेमका काय आहे? या आजारातून बाहेर कसं पडायचं? तसेच याची लक्षणे काय आहेत याची माहिती आज या बातमीतून जाणून घेणार आहोत.

काय आहे डेड बट सिंड्रोम?

जास्त वेळ एकाच जागी बसून काम केल्यावर मांडीच्या मांस पेशी सुन्न होतात आणि झटपट हालचाल करता येत नाही तेव्हा डेड बट सिंड्रोम असतो. डेड बट सिंड्रोम तेव्हाच होतो जेव्हा आपल्या मांडीच्या मांस पेशी सुन्न होतात आणि अजिबात काम करत नाहीत.

बराच वेळ एकाच जागी एकाच पोजमध्ये बसल्याने मांस पेशी पॅसिव मोडमध्ये जातात. आपलं शरीर मांस पेशींना पुन्हा अॅक्टीव करणे विसरून जाते. त्यामुळे डेड बट सिंड्रोमला ग्लूटीयल एम्रेशिया सुद्धा म्हटलं जातं.

सतत बसून राहिल्याने आपल्या शरीराची काहीच हालचाल होत नाही. त्यामुळे गुडघे, पाठ आणि शरीरातील सर्वच सांधे हळूहळू दुखू लागतात.

डेड बट सिंड्रोमची लक्षणे?

काय आहे डेड बट सिंड्रोममुळे शरीरातील अवयवांना मुंग्या येण्यास सुरुवात होते. त्यामुळे सांधे दुखी जास्त वाढते.

जेव्हा तुम्हाला काय आहे डेड बट सिंड्रोम जास्त प्रमाणात होतो तेव्हा हात आणि पायांना अचानक सूज येण्यास सुरुवात होते.

काय आहे डेड बट सिंड्रोम तीव्र असल्यास याचा त्रास अगदी पायांच्या तळव्यांपर्यंत सुद्धा जाणवतो. काही व्यक्तींना अचानक पायांच्या तळव्यांना जळजळ जाणवते. हिप्स दुखू लागतात. जेव्हा आपण जास्तवेळ एकाच ठिकाणी बसतो. तेव्हा अन्य सर्व शरीराचा भार आपल्या हिप्सवर येतो. त्यामुळे व्यक्तींना जागेवरून उठून चालणे सुद्धा कठीण होते.

काय आहे डेड बट सिंड्रोमवर उपाय

काय आहे डेड बट सिंड्रोम या आजारापासून स्वत:चा बचाव करायचा असेल तर जास्तवेळ एकाच जागी बसणे टाळा. तसेच दररोज एक्सरसाइज करण्यास सुरुवात करा. यामध्ये स्क्वॉट, जंपिंग जॅक्स करा. तुम्हाला जितके शक्य असेल तितकी जास्तीत जास्त हालचाल करा. त्यासह दररोज किमान आर्धा तास तरी चाला. स्ट्रेचिंग आणि ग्लूटियल एक्सरसाइज सुद्धा करा.

Dead Butt Syndrome
Zika Virus Symptoms: 'ही' आहेत झिका व्हायरसची लक्षणे!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com