What Is 'Bare Minimum Monday': असा मॅनेज करा कामाचा ताण, नेमकं काय आहे 'बेअर मिनियम मंडे' च फ्याडं

How it works and what experts think : शनिवार आणि रविवारची सुट्टी संपली की सोमवारी कामावर येऊन काम करायचा बऱ्याच जणांना भरपूर कंटाळा येतो.
What Is 'Bare Minimum Monday'
What Is 'Bare Minimum Monday'Saam Tv
Published On

Bare Minimum Monday : शनिवार आणि रविवारची सुट्टी संपली की सोमवारी कामावर येऊन काम करायचा बऱ्याच जणांना भरपूर कंटाळा येतो. त्यात सुट्ट्यांमुळे पेंडिग कामाचा सगळा ताण आठवड्याच्या पहिल्या दिवसावर येतो

सुट्टीमुळे (Holiday) सुस्तावलेले शरीर कामाचा भार उचलण्यास कंटाळा करते. यामुळे कामावर तर परिणाम होतोच पण त्याचबरोबर कामाच्या अतिरिक्त तणावामुळे (Stress) शरीरावरही परिणाम होतो. याच गोष्टीस लक्षात घेऊन ऑस्ट्रेलियात यावर एक हटके उपाय (Remedies) शोधून काढला आहे.

What Is 'Bare Minimum Monday'
CV vs Resume : नोकरीच्या शोधात आहात ? मग, CV आणि Resume मधला फरक काय ? जाणून घ्या

ऑस्ट्रेलियात नुकत्याच सुरु झालेल्या 'बेअर मिनियम मंडे' या नव्या वर्क कल्चरची सध्या सर्वत्र चर्चा आहे. आठवड्याच्या पहिल्या दिवशी कामाच्या अतिरीक्त तणावामुळे आपल्या कर्मचाऱ्यांना काम करताना येणाऱ्या समस्येस लक्षात घेऊन हे नवे 'ऑफिस कल्चर' सुरू करण्यात आले आहे.

1. काय आहे 'बेअर मिनियम मंडे' कल्चर?

याची सुरूवात ऑस्ट्रेलियातील एका मार्केटिंग कपंनीतील मॅनेजरने केली. आपल्या कर्मचाऱ्यांची मानसिक स्थिती जपण्यासाठी या कल्चरचा वापर सध्या ऑस्ट्रेलियात केला जात आहे. या कल्चरमध्ये काम करण्याची खास व वेगळी पद्धत आहे. ज्यामध्ये सोमवारी कामाचा अतिरीक्त ताण येऊ नये याकरीता कर्मचाऱ्यांना फक्त महत्त्वाचे तितकेच काम करण्याची परवानगी ऑफिसेसकडून देण्यात येते. याचा फायदा असा होतो की यामुळे कर्मचाऱ्यांना कामाचा भार जाणवत नाही व काम करताना त्यांची मनःस्थिती चांगली राहाते.

What Is 'Bare Minimum Monday'
Employee Advance Salary : खुशखबर! आता सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार अ‍ॅडव्हान्स सॅलरी, जाणून घ्या सविस्तर

तरी बऱ्याच ऑफिसेसमध्ये ही पद्धत थोडीशी वेगळी असली तरी त्याचा हेतू मात्र एकच आहे. याचा अजून एक फायदा म्हणजे आठवड्याच्या पहिल्या दिवशी कामाचा तितका ताण नसल्यामुळे कामाची चांगली सुरूवात होते. ज्यामुळे आठवडाभर काम कराण्याची पॉझिटिव्हीटी देखील मिळते.

2. का गरज भासली या नव्या वर्क कल्चरची?

काम करण्याच्या या नव्या पद्धतीची सुरूवात करणाऱ्या कॅटलिन विंटर यांच्या मते, 'बेयर मिनिमम मंडे' या कामाच्या पद्धतीमध्ये कर्मचाऱ्यांना आपल्या पद्धतीने काम करण्याची सुट दिली जाते. ज्यामुळे त्यांच्या आठवड्याची सुरूवात चांगली होते आणि त्यांना संपूर्ण आठवडा काम करण्याची ताकद मिळते. आठवड्याच्या पहिल्या दिवशी कर्मचाऱ्यांना कामाचा ताण दिल्यास त्याचा कर्मचाऱ्यांच्या मानसिक स्थितीवर आणि कामावर परिणाम होतो.

What Is 'Bare Minimum Monday'
Mental Stress Disease : मानसिक तणावामुळे वाढतोय जीवघेण्या आजारांचा धोका !

3. 'बेअर मिनिमम मंडे' या पद्धतीत कशा प्रकारे काम केले जाते?

1. सोमवारी टिम मेंबर्सना वर्क फॉर्म होम करण्याचे स्वातंत्र दिले जाते.

2. आठवड्याच्या पहिल्या दिवशी कोणतीही मीटींग आयोजित केली जात नाही. ज्यामुळे कर्मचारी आपल्या महत्त्वाच्या कामात जास्त लक्ष देऊ शकतात.

3. कर्मचारी आपले सुट्टीतील अपुरे काम पूर्ण करू शकतात.

What Is 'Bare Minimum Monday'
Mental Health : मानसिकदृष्ट्या मजबूत राहण्यासाठी 'या' टिप्स फॉलो करा

यासर्व गोष्टींचे पालन या पद्धतीत केले जाते असे, विंटर यांनी सांगितले. या वर्क कल्चरचे फायदे सांगत त्यांनी आपल्या एका कर्मचाऱ्यांचे उदाहरण दिले, सोमवारी कामाचा ताण हलका केल्याने माझे कर्मचारी काम आणि त्यांच्या आयुष्यात समतोल साधू शकत आहेत. यामुळे त्यांचे वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यांत व कामात चांगले बदल होतात, असे देखील त्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com