Pregnancy Health Tips : बाळाला जन्म देण्यासाठी योग्य वय कोणतं? उशिर झाल्यास तुम्हालाही येतील या अडचणी

Prefect age for Getting Pregnant : महिला चूल आणि मुल या दोन गोष्टींपर्यंत मर्यादित राहिलेली नसून, ती पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून नोकरी करत आहे. सोबतच शिक्षण घेऊन, स्वतःच्या पायावर उभ राहून
Pregnancy Health Tips
Pregnancy Health TipsSaam TV

एखाद्या महिलेच्या आयुष्यात तिचा पुनर्जन्म म्हणजे तिचं आई होणे असतं असं संपूर्ण जग म्हणतं. अशातच तुम्ही आतापर्यंत बऱ्याचदा वडीलधाऱ्या व्यक्तींच्या तोंडातून हे वाक्य नक्की ऐकलं असेल की, मुलीचं लग्न आणि मूलबाळ योग्य वयातच झालेल चांगलं असतं. त्यांचा हे बोलण्यामागचा हेतू नेमका काय असतो? बाळ जन्माला घालण्यासाठी महिलेचं योग्य वय नेमकं कोणतं? याबाबत अधिक माहिती जाणून घेऊ.

Pregnancy Health Tips
Gautami Patil Age: 'लाखो दिलों की धडकन' गौतमी पाटीलचं खरं वय किती?

फक्त वडीलधाऱ्या व्यक्तीच नाही तर, ऑफिस फॉर नॅशनल स्टॅटिक्समध्ये एक अभ्यासिका प्रकाशित झाली होती. त्यामध्ये असं सांगण्यात आलं होतं की, 2020 सालापासून अनेक महिलांनी 30शी ओलांडली आहे. परंतु त्यांना मूलबाळ नाही किंवा त्यांनी मूल कन्सिव्ह करण्यासाठी चान्स घेतला नाही.

आत्ताची महिला चूल आणि मुल या दोन गोष्टींपर्यंत मर्यादित राहिलेली नसून, ती पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून नोकरी करत आहे. सोबतच शिक्षण घेऊन, स्वतःच्या पायावर उभ राहून स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे.

या सगळ्या जीवनशैलीमुळे वौवाहिक जीवनात वेळ मिळत नाही. या कारणामुळे अनेक महिला स्वतःच्या सोयीप्रमाणे मुल जन्माला घालण्याचा विचार करतात. यामध्ये सध्या उशिरा मुल जन्माला घालण्याचा ट्रेंड सुरू आहे.

अनेक कपल्स पूर्णपणे सेटल झाल्यानंतरच मूल जन्माला घालण्याचा विचार करतात. परंतु 30 किंवा 35 हे वय उलटून गेल्यानंतर जन्माला आलेली मुलं अबनॉर्मल किंवा मतिमंद असल्याची पहायला मिळतात.

वयाची ३५ वर्षे ओलांडल्यानंतर महिलांमध्ये गर्भधारणेवर परिणाम होऊ लागतो. अंडाशयाची गुणवत्ता कमी होत जाते. त्यामुळे ३५ किंवा ४० व्या वर्षी जन्माला आलेली मुलं बुद्धीने कमजोर राहतात. किंवा त्यांच्यामध्ये जास्त अशक्तपना येतो.

Pregnancy Health Tips
Stray Dog Age : कुत्र्यांचं आयुष्य ४ वर्षांनी घटलं; माणसाशी आहे थेट संबंध? काय आहे नेमकं कारण? जाणून घ्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com