Hernia Disease : पुरुषांमध्ये हर्नियाचा धोका अधिक? लक्षणे कोणती? जाणून घ्या तज्ज्ञांकडून

Hernia Causes : आपल्या पोटातील स्नायू जेव्हा कमजोर बनतात आणि सततच्या खोकल्यामुळे किंवा लघवी व बद्धकोष्ठतेमुळे जोर द्यावा लागल्यामुळे हर्निया होतो.
Hernia Disease
Hernia DiseaseSaam Tv

Hernia Symptoms :

आपल्या पोटातील स्नायू जेव्हा कमजोर बनतात आणि सततच्या खोकल्यामुळे किंवा लघवी व बद्धकोष्ठतेमुळे जोर द्यावा लागल्यामुळे हर्निया होतो. म्हणजे आपल्या शरीरातील नैसर्गिक किंवा अनैसर्गिक छिद्रांतून एखादा अवयव, इंद्रिय किंवा त्या अवयवाचा भाग बाहेर येतो. हर्नियाबाबत अनेक गैरसमज लोकांमध्ये आढळून येतात जे वेळीच दूर करुन वास्तविकता जाणून घेणे गरजेचे आहे.

याविषयीची माहिती दिलीये मुंबईतील अपोलो स्पेक्ट्राचे जनरल सर्जन डॉ. लकीन विरा यांनी ते म्हणतात, काही वेळेस हर्निया अत्यंत वेदनादायक (Pain) असू शकतो आणि एखाद्याची मनःशांती हिरावतो. वाकताना, खोकताना किंवा वस्तू उचलताना मांडीच्या भागात वेदना किंवा अस्वस्थता अनुभवणे, सतत ओटीपोटात दुखणे, पोट फुगणे, मळमळ आणि उलट्या ही या स्थितीची लक्षणे (Symptoms) असू शकतात ज्यासाठी त्वरित उपचार आवश्यक आहे. अनेक गैरसमजूतींमुळे हर्नियाचा त्रास होत असलेल्या लोकांना डॉक्टरांची मदत घेण्यास विलंब होतो.

1. हर्नियाशी संबंधित गैरसमजूती कोणत्या?

हर्निया फक्त पुरुषांमध्ये आढळून येणारी एक सामान्य घटना आहे हा एक गैरसमज आहे. वास्तविकता स्त्रियांना देखील हर्नियाचा धोका असतो, विशेषतः गर्भधारणेनंतर त्यांना हर्नियाची समस्या उद्भवू शकते. सुमारे 10% स्त्रियांना त्यांच्या आयुष्यात हर्नियाचा त्रास सहन करतात.

Hernia Disease
Prostate Cancer Symptoms: पुरुषांमध्ये वाढतोय प्रोस्टेट कॅन्सरचा धोका? ही लक्षणे दिसताच डॉक्टरांचा घ्या सल्ला

हर्नियाला कोणत्याही उपचारांची आवश्यकता नाही आणि ते आपोआप बरे होते हा देखील एक गैरसमज आहे. खरं तर हर्नियास त्वरित उपचारांची आवश्यकता असते. शिवाय मोठ्या आकाराच्या हर्नियाचा सामना करण्यासाठी आणि पुढील गुंतागुंत टाळण्यासाठी सर्जिकल उपचारांची आवश्यकता भासू शकते.

वजन कमी केल्याने हर्नियाचे व्यवस्थापन करण्यात मदत होते हा देखील एक गैरसमज आहे. वास्तविकता वजन कमी केल्याने हर्नियाचा आकार कमी होतो. हर्नियाच्या व्यवस्थापनासाठी खुल्या किंवा लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रियेची गरज भासू शकते. उपचाराकरिता डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन करणे योग्य राहिल.

Hernia Disease
Hair Growth Smoothie : सततच्या केस गळतीमुळे वैतागले आहात? बायोटिन स्मूदी ठरेल फायदेशीर

हर्नियासह जगणे अत्यंत वेदनादायक आणि गैरसोयीचे असते हा देखील एक गैरसमज आहे. हर्नियामुळे त्रासदायक वेदना होत नसल्यास लोक अनेक वर्षे सामान्य आयुष्य जगतात. जर हर्निया आकाराने मोठा असेल तर डॉक्टर शस्त्रक्रियेचा सल्ला देतात ज्याने रुग्णाच्या जीवाला अधिक धोका असतो.

रुग्ण हर्नियाला मागे ढकलू शकतात हा एक मोठा गैरमज आहे. एखादी व्यक्ती स्वतःहून हर्निया ढकलू शकत नाही आणि तसे करण्याचा प्रयत्न देखील करू नये. यासाठी वेळीच वैद्यकिय सल्ला आणि उपचारांची आवश्यकता आहे.

हर्निया फक्त लठ्ठ लोकांमध्ये आढळतो हा देखील गैरसमज आहे. हर्निया सर्व वयोगटातील लोकांना त्यांच्या वयाचा विचार न करता होऊ शकतो. जे ओटीपोटावर ताण देणाऱ्या क्रिया करतात त्यांना या स्थितीचा अधिक त्रास होतो.

Hernia Disease
Hydrate Drink : उन्हाळ्यात रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवायचीये? या ड्रिंक्सचा करा समावेश

हर्निया ही गंभीर वैद्यकीय स्थिती नाही हा देखील एक गैरसमज आहे. इनग्विनल हर्निया हे प्राणघातक असतात आणि त्यांना त्वरित वैद्यकिय उपचारांची आवश्यकता असते. जेव्हा हर्नियामुळे आतड्यात रक्त प्रवाह बंद होतो तेव्हा असे होते.

हर्नियाची लॅपरोस्कोपी शस्त्रक्रिया वेदनादायक असते आणि त्याचे चांगले परिणाम मिळत नाहीत हा गैरसमज आहे. वास्तविकता लॅप्रोस्कोपी ही वेदना कमी करत जलद पुनर्प्राप्तीसह, कमीत कमी जोखमीची प्रक्रिया आहे. हे अत्यंत सुरक्षित आणि प्रभावी मार्ग आहे.

2. मुलांना हर्नियाचा त्रास होत नाही हा एक गैरसमज आहे.

धक्कादायक बाब म्हणजे केवळ लहान मुलेच नाही तर नवजात शिशुंमध्येही इनग्विनल हर्नियाचे निदान होते. म्हणूनच, पालकांना नवजात अर्भकामध्ये हर्नियाची लक्षणे आढळल्यास असल्यास त्वरीत नवजात शिशु तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com