World Hand Hygiene Day: तुम्ही हात धुण्यासाठी कशाचा वापर करता ? साबण की, लिक्विड ? सतत हात धुणे योग्य आहे का ?

Handwash Tips : अनेकांना अशी सवय असते की, ते सतत साबण किंवा लिक्विडने हात धुत राहातात. पण असे करणे योग्य आहे का ?
Which is Better For Washing Hand
Which is Better For Washing HandSaam tv

Soap Bar Vs Liquid Hand Wash: आपल्याला नेहमीच सगळे सांगतात की, जेवणापूर्वी किंवा कोणताही अन्नपदार्थ खाताना हात स्वच्छ धुवायला हवे. त्यापैकी अनेकांना अशी सवय असते की, ते सतत साबण किंवा लिक्विडने हात धुत राहातात. पण असे करणे योग्य आहे का ?

तुम्ही हात कशाने धुताना साबण की, लिक्विड ? त्याचा आरोग्यावर परिणाम होतो का ? बरेचदा असे होते की, काम करताना आपल्याला खाण्याची सवय असते. बसल्याजागी खाण्याच्या या सवयीमुळे आपल्याला आरोग्याच्या (Health) इतर समस्यांना समोरे जावे लागते.

Which is Better For Washing Hand
Hand Dryer Side Effects : हॅन्ड ड्रायर्सचा वापर करताय? ही बातमी एकदा जरूर वाचा

1. दिवसांतून किती वेळा हात धुवायला हवे ?

हात धुण्याने बॅक्टेरियाचा संसर्ग होत नाही. तसेच फ्लू आणि अन्नातून होणारी विषबाधा टाळतात. परंतु, फक्त दिवसांतून किमान ८ ते १० वेळा हात धुवायला हवे. अन्न खाण्यापूर्वी व शौचालयात गेल्यानंतर हात व्यवस्थित स्वच्छ (Clean) करायला हवे.

त्वचारोगतज्ज्ञ डॉ. सुमित गुप्ता सांगतात की, हात किती वेळा धुवावेत हे तुम्ही करत असलेल्या कामावर अवलंबून आहे. स्वयंपाकघरात (kitchen) जेवण बनवणारी महिला ही इतरांपेक्षा जास्त वेळा हात धुते. तसेच कार्यालयात काम करणाऱ्यांपेक्षा पशुपालक, कारखान्यातील कामगारांना जास्त हात धुवावे लागतात. रुग्णालयात काम करणाऱ्या नर्स व डॉक्टरांना दिवसातून अनेक वेळा हात धुवावे लागतात.

Which is Better For Washing Hand
Vertigo Disease Symptoms: चालताना गरगरल्यासारखे वाटते ? असू शकतो व्हर्टिगोचा आजार, जाणून घ्या लक्षणे

2. हात कसे धुवायला हवे ?

डॉक्टरांचे असे म्हणणे आहे की, हात धुता तुम्ही ते कसे धुता यावर अवलंबून आहे. जर तुम्ही हात नीट धुतले नाहीतर त्याचा उपोयग होत नाही व संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो.

3. गरम पाण्याने हात धुणे कधीही चांगले

बराच काळ हात धुण्यासाठी माती आणि राख वापरली जात होती. मग साबण आणि लिक्विड सोपचा ट्रेंड आला. आता सॅनिटायझर आणि टिश्यू हँडवॉशचा ट्रेंड आहे. 20 ते 30 सेकंद हात धुणे देखील पुरेसे आहे. त्यामुळे हात जंतूमुक्त होतात. जर्नल ऑफ फूड प्रोटेक्शनमध्ये प्रकाशित झालेल्या रिपोर्टनुसार, गरम पाण्यात 10 सेकंद हात ठेवल्याने हानिकारक बॅक्टेरिया नष्ट होतात.

Which is Better For Washing Hand
Marriage Advice : जोडप्यांनो, लग्नानंतर या टिप्स पडतील नात्यात उपयोगी

4. लिक्विड हँडवॉशनेही बॅक्टेरिया दूर होत नाहीत

बरेच लोक लोशन किंवा लिक्विड हँडवॉश वापरतात. पण ते पूर्णपणे सुरक्षित नाही. याच्या वापराने हाताला ओलावा मिळतो. कोरड्या त्वचेला आराम मिळतो. असे असूनही हातावर जीवाणू तसेच राहतात. साबणाने हात धुणे हा सर्वात चांगला मार्ग आहे. मात्र, वापरलेला साबण इतर कोणत्याही कारणासाठी वापरू नये, याची काळजी घ्यावी. चिखलाने किंवा राखेने हात धुवू नयेत. जंतू जमिनीत लपून राहतात जे हाताला चिकटतात. त्यामुळे शौच केल्यानंतर हात साबणाने धुणे आवश्यक आहे.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com