
अनेकांना हृदयाच्या बायपास सर्जरीचा विचार येतो तेव्हा मनात भीती येते. आपलं काम थांबेल, साहस करणं थांबेल आणि आयुष्याला मर्यादा येतील. पण सत्य पूर्णपणे वेगळे आहे. बायपास सर्जरी म्हणजे तुमच्या कार्यरत जीवनाचा शेवट नाही तर ती एक नवीन सुरूवात आहे! योग्य खबरदारी आणि निरोगी जीवनशैलीसह शस्त्रक्रियेनंतर हृदयाचे कार्य चांगले राहते आणि तुम्हाला जुन्या दिनचर्येत परत जाण्यापासून किंवा अगदी एव्हरेस्ट बेस कॅम्पला ट्रेकिंग करण्यापासून काहीही रोखत नाही.
बायपास सर्जरीला सीएबीजी किंवा कलिनरी आर्टरी बायपास ग्राफ्ट सर्जरी असंही म्हणतात. तुमच्या तिन्ही धमन्यांमध्ये गंभीर ब्लॉकेज असतात आणि केस अँजिओप्लास्टीसाठी योग्य नसते तेव्हा ती केली जाते.
माहीमच्या हिंदुजा हॉस्पिटलमधील कार्डिव्हॅस्क्युलर सर्जन डॉ. कौशल पांडे म्हणाले की, योग्य उपचारांचा निर्णय घेण्यासाठी अँजिओग्राफी ही एक महत्त्वाची चाचणी आहे. ती डॉक्टरांना रुग्णाच्या हृदयासाठी आवश्यक ती पावलं ठरवण्यास मदत करते. तुमच्या निकालांनुसार काही रुग्णांना अँजिओप्लास्टी किंवा स्टेंटिंगची आवश्यकता असू शकते, तर काहींना त्यांच्या धमन्या स्वच्छ ठेवण्यासाठी पुन्हा स्टेंटिंग प्रक्रियेची आवश्यकता असू शकते.
आजकाल अँजिओप्लास्टी आणि स्टेंटिंग एकमेकांशी संबंधित आहेत. अँजिओप्लास्टी करणाऱ्या प्रत्येक रूग्णाला दीर्घकालीन फायद्यांसाठी स्टेंट दिला जातो. अँजिओप्लास्टीचा मूळ अर्थ पूर्वी बलून अँजिओप्लास्टी असून ब्लॉक केलेल्या धमन्या उघडण्यासाठी बलूनचा वापर केला जात असे. नंतर डॉक्टरांना लक्षात येऊ लागले की, ५-१० वर्षांत अनेक ब्लॉकेज परत येत आहेत. कधी-कधी काही प्रकरणांमध्ये तर ते काही आठवड्यांत परतले. धमनीत धातूचा स्टेंट ठेवल्याने ब्लॉकेज परत येण्यापासून रोखण्यास मदत होते आणि ते परत येण्याचं प्रमाण कमी होते, असे संशोधनातून असे दिसून आले आहे.
बेअर मेटल स्टेंट (पहिल्या पिढीतील): सुरूवातीचे स्टेंट फक्त धातूचे होते. ते रचनात्मक आधार देत असत परंतु त्याला मर्यादा होत्या.
औषधावर आधारित स्टेंट: नंतर काळात ड्रग-एल्युटिंग स्टेंट (डीईएस) आले. त्यात पुन्हा ब्लॉकेज टाळण्यासाठी औषधे वापरण्यात आली आणि त्यामुळे ते दीर्घकाळात अधिक प्रभावी झाले.
बायपास सर्जरीचा परिणाम रूग्णाच्या प्रकृतीनुसार बदलतो आणि अनेकदा त्यांना दीर्घ, निरोगी आणि अधिक समाधानकारक आयुष्य मिळते. काही रुग्णांबाबत बायपास सर्जरीमुळे त्यांचे आयुष्य खूप सुधारतं तसंच जीवनाची गुणवत्ता वाढते आणि त्यांना पुढील अनेक वर्षे सक्रिय व निरोगी आयुष्य जगता येते.
२० ते ३० वर्षे वयोगटातील तरूणांनी सकस आहार घ्यावा, व्यायाम केला पाहिजे आणि धूम्रपान करू नये. त्यांनी आठवड्यातून किमान १५० ते १८० मिनिटे व्यायाम केला पाहिजे आणि कार्डिओसाठी वेळ दिलाच पाहिजे.
योग्य आहार घेणं महत्वाचे आहे. रेस्टॉरंटमध्ये जाणे किंवा बाहेर जेवण्याचा अलिकडचा ट्रेंड आता सामान्य झाला आहे. कारण अनेक लोक विविध कारणांमुळे त्यांच्या कुटुंबापासून दूर राहतात. त्यामुळे आपली जीवनशैली जाणीवपूर्वक बदलणे आणि सकस अन्नाची सवय लावणे अत्यंत महत्वाचे आहे.
तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे ऑपरेशन प्रक्रियेत खरोखर काय बदल झाले आहेत असा प्रश्न आपल्याला पडू शकतो. त्याचे उत्तर म्हणजे अचूकता आणि सुरक्षितता वाढली आहे. अत्याधुनिक ऑपरेशन थिएटरपासून ते अत्याधुनिक प्रकाशयोजना, भूल आणि तज्ञ भूलतज्ज्ञांपर्यंत प्रत्येक बाबतीत मोठे बदल झाले आहेत.
आपल्याकडे आता अशी साधने आहेत, ज्याद्वारे बायपास सर्जरीनंतर तुमचे सर्व बायपास योग्य पद्धतीने काम करत आहेत की नाही हे तपासता येते. रूग्ण ऑपरेशन थिएटरमधून बाहेर पडतो तेव्हा आम्हाला सर्व बायपास योग्यरित्या काम करत असल्याची खात्री पटते.
रोबोटिक शस्त्रक्रिया ही खास करून व्हिज्युअलायझेशनच्या बाबतीत एक मोठा सकारात्मक बदल आहे. धमन्या मोठ्या दिसत असल्याने अचूकता वाढते आणि सर्जनला अधिक कार्यक्षमतेने काम करता येते. परंतु रोबोट सर्जनची जागा घेऊ शकणार नाही. मानवी हस्तक्षेप आणि त्वरित निर्णय घेण्याची क्षमता किमान ऑपरेशन थिएटरमध्ये निर्णय घेण्याच्या बाबतीत तरी एआय आणि रोबोट्सद्वारे करता येत नाही.
आजच्या सीएबीजीमुळे दीर्घायुष्य मिळते. अनुभवी सर्जन्सनी शस्त्रक्रिया केल्यावर गुंतागुंत होण्याचा धोका कमी होतो. सुधारित इमेजिंग आणि रिफाइन्ड सर्जिकल तंत्रांसारख्या प्रगतीमुळे अचूकता आणि रुग्णांचे लाभ आणखी वाढले आहेत.
बायपास सर्जरी ही एक सुरक्षित व सर्वसामान्य प्रक्रिया आहे आणि तिचे दीर्घकालीन फायदे आहेत. रूग्णांनी सर्वसमावेशक उपचार पद्धतीच्या आणि चांगले आयुष्य जगण्याच्या दृष्टीने सकारात्मक विचार करताना हृदयरोगतज्ज्ञ आणि सर्जन्स या दोघांचाही सल्ला घेणे आवश्यक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.