Heart Attack Symptoms: हार्ट अटॅक येण्याआधी दिसतात 'ही' ४ सामान्य लक्षणे; अजिबात करू नका दुर्लक्ष

Heart Attack: सध्याची धावपळीची जीवनशैली, खाण्याच्या पद्धती थेट आपल्या शरीरावर परिणाम करतात. त्यामुळे हार्ट अटॅकचे प्रमाण वाढले आहे. या समस्येपासून लांब राहायचे असल्यास तुम्हाला तुमचं शरीरचं काही संकेत देते.
heart attack
heart attack painsaam tv
Published On

सध्याची धावपळीची जीवनशैली, खाण्याच्या पद्धती थेट आपल्या शरीरावर परिणाम करतात. त्यामुळे हार्ट अटॅकचे प्रमाण वाढले आहे. या समस्येपासून लांब राहायचे असल्यास तुम्हाला तुमचं शरीरचं काही संकेत देते. तज्ज्ञांच्या मते, हार्ट अटॅक कधीच अचानक येत नाही. तर हार्ट अटॅक येण्याआधी साधारण एक महिना शरीर आपल्याला संकेत देत. ते संकेत कोणते हे आपण पुढील माहितीतून जाणून घेऊ.

heart attack
Maha Shivratri 2025 Vrat: महाशिवरात्रीला उपवास करणार आहात? नियमानुसार 'हे' पदार्थ चुकूनही खाऊ नका

हार्ट अटॅक येण्याआधीची लक्षणे

१. छातीत वेदना.

हार्ट अटॅक येण्याआधी छातीत अनेक लक्षणे जाणवतात. जसे की, छातीत हलके दुखणे, जळजळ होणे, दबाव जाणवणे या समस्या दिसल्यास अजिबात दुर्लक्ष करू नका. हार्ट अटॅक येण्याआधी आपल्या रक्तवाहिन्या ब्लॉक होऊ लागतात. त्याचा परिणाम आपल्या शरीरावर दिसू शकतो.

२. थकवा आणि कमजोरी

तुम्हाला कोणतेही काम न करता थकवा जाणवत असेल तर त्वरित डॉक्टरांकडे धाव घ्या. कारण हे लक्षण ह्रदय कमजोर होऊ शकते. त्यामुळे तुमचे शरीर लवकर थकू शकते.

३. श्वास घ्यायला त्रास होणे

तुम्हाला कमीत कमी चालून जास्तीत जास्त थकवा येत असेल तर तुम्हाला हार्ट अटॅकचा धोका असू शकतो. त्यात काही काम केल्यानंतर जर तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होत असेल तर हे देखील एक धोकादायक लक्षण असू शकते.

४. झोपेचा त्रास आणि अस्वस्थता

जर तुम्हाला रात्रीत वारंवार जाग येत असेल किंवा कोणत्याही कारणाशिवाय अस्वस्थ वाटत असेल तर हा हार्ट अटॅकचा इशारा समजावा. बऱ्याचदा लोक या समस्यांना तणावाचे कारण समजतात. असा सामान्य वाटणाऱ्या समस्या कधी रौद्र रुप धारण करतील याचा आपण अंदाज घेऊ शकत नाहीत.

heart attack
Butter Pav Bhaji Recipe: झटपट बटर पाव भाजी बनवण्याची सगळ्यात सोपी रेसिपी; जाणून घ्या 'या' 3 टीप्स

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com