
पाव भाजी ही सगळ्यांची आवडती डीश मानली जाते. तरुणांपासून ते वृद्धांपर्यंत पाव भाजी आजही आवडीने खाल्ली जाते. आज आपण कुकरमधली पाव भाजी कशी तयार करायची? ही रेसिपी पाहणार आहोत. मात्र त्या आधी पाव भाजीचा थोडक्यात इतिहास समजून घेऊया. पावभाजीचा इतिहास अमेरिकेतील गृहयुद्धाशी आणि पोर्तुगीजांशी संबंधित आहे.
मुंबईतील कापड गिरणीतील कामगार पुर्वी जास्त वेळ काम करायचे. त्यावेळेस पोर्तुगीज सर्व भाज्या एकत्र करून भाजी बनवत असत. ब्रेडला पोर्तुगीजमध्ये 'पाओ' म्हणतात आणि भारतात त्याला पाव देखील म्हणतात. हाच पदार्थ कापड गिरणीतील कामगारांना दिला जायचा. त्याला ते पाव भाजी म्हणू लागले. पुढे शहरातील रेस्टॉरंट्समध्ये पावभाजी वाढली जाऊ लागली. तर आता लोक स्टीट स्टाईल पाव भाजीच्या प्रेमात आहेत. चला तर जाणून घेऊ ही स्पेशल अशी घरगुती पाव भाजी स्पेशल रेसिपी.
पाव भाजीचे साहित्य
२ टेबलस्पून पावभाजी मसाला
२ टेबलस्पून तेल
४ टेबलस्पून बटर
२ टेबलस्पून काश्मिरी तिखट
पाव चमचा हळद
चवीनुसार मीठ
आलं लसणाची पेस्ट
कांदा
पाव
गाजर
वाटाणे
टोमॅटो
बीट
फ्लॉवर
बटाटा इ.
पाककृती
सगळ्यात आधी भाज्या स्वच्छ धुवून घ्या. मग बटाट्याचे दोन भाग करून तुम्ही सगळ्या भाज्या कुकरमध्ये शिजायला ठेवा. सोबत त्यात एक ग्लास पाणी ओता. कुकरच्या साधारण दोन शिट्ट्या झाल्यावर तुम्ही गॅस बंद करा. लक्षात ठेवा कुकर थंड झाल्याशिवाय तो उघडू नका.
पुढे कुकर थंड झाल्यावर भाज्यांमधले पाणी गाळून घ्या. आणि टोमॅटोचे साल काढून घ्या. आता सगळ्या भाज्या एका मिक्सरमध्ये घालून जाडसर वाटून घ्या. तुम्ही मॅशरचा सुद्धा वापर करू शकता. मात्र ही पद्धत फॉलो केल्याने तुम्हाला पावभाजी तयार करायला कमी वेळ लागेल. आता फोडणीची तयारी करायला घ्या.
फोडणीसाठी एक कढई किंवा कुकर सु्द्धा घेऊ शकता. त्यात बटर आणि तेल दोन्ही घाला. पुढे बारिक कांदा घ्या. त्यात आलं लसणाची पेस्ट मिक्स करून घ्या. कांदा परतून झाल्यावर त्यात सर्व मसाले घाला आणि स्लो गॅसवर परता मग तयार भाजी त्यात मिक्स करा. छान ५ ते ६ मिनिटे परतून घ्या. दुसरीकडे बटर पाव गरम करून तयार गरमा गरम पाव भाजी परतून घ्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.