Weight Loss: फॅट कमी करायचा असेल तर वापरा 'या' सोप्या ट्रिक्स

fat loss at home : आपल्याला फीट आणि परफेक्ट दिसायला नेहमीच आवडतं. त्यासाठी आपण काय केले पाहिजे ते लक्षात घेणे महत्वाचे आहे.
fat loss at home
Weight Lossyandex
Published On

रोजच्या कामाच्या गडबडीत आपण जेवणाची वेळ पाळायला विसरतो. त्याचा परिणाम थेट आपल्या शरीरावर दिसायला लागतो. आपण खुप थकतो त्यावेळेस आपण जेवण करणे टाळतो. कधी मित्रांबरोबर मोठ्या हॉटेल्समध्ये जावून पार्टी करतो. त्या दरम्यान तळलेले पदार्थ, जंक फूड, अल्कोहोलीक पदार्थांचे सेवन करतो. त्याने सुद्धा आपल्या फॅट वाढत असतो. त्यातच दिवाळी हा सण काही दिवसांवर आला आहे.

प्रत्येकालाच या दिवसांमध्ये फिट आणि सुंदर दिसायचे असते. त्यासाठी आपण वजन करणे टाळतो. आपल्याला वाटतं जेवण सोडले की, आपले वजन आणि फॅट दोन्ही कमी होईल. पण या सगळ्या गोष्टी करुनही तुमचे वजन कमी होत नसेल तर, काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही पुढील पद्धतीने तुमचा फॅट कमी करु शकता. याचा परिणाम तुम्हाला काही दिवसांत दिसेल. जाणून घ्या सोप्पी घरगुती पद्धत.

fat loss at home
Health Tip: गार की कोमट; व्यायाम करताना कोणतं पाणी प्यावं? जाणून घ्या

फॅट लॉस करण्यासाठी आपण चुकीच्या पद्धतींचा वापर केला तर त्याचा वाईट परिणाम होवू शकतो. आपण आजारांना सुद्धा सामोरे जावू शकतो. त्यासाठी योग्य पद्धतींचाच वापर करा. सगळ्यात आधी तुम्ही रोज किमान २० मिनिटे व्यायाम करायला सरुवात करा. त्याने काही दिवसातच तुमच्या वजनात फरक जाणवेल.

तुम्ही काही दिवस मिळेल तितका वेळ चाला. जितका तुमच्या शरीरातला घाम जाईल, तितका तुमचा फॅट लॉस होईल. तुम्ही योग्य आहार घ्या. त्यात जास्त तेलकट पदार्थांचा समावेश करु नका. काकडी, गाजर, बीट यांचा आहारासोबत समावेश करा.

गोड पदार्थ खाणे टाळा.

गोड पदार्थांने सुद्धा तुमचा फॅट वाढू शकतो. तुम्ही गोड पदार्थ खाणारे असाल तर नक्कीच मेथीच्या पाण्याचे सेवन करा.मेथीचे पाणी रोज पिणे शरीरासाठी खुप फायदेशीर आहे. मेथीच्या दाण्यात सोडियम, झिंक, फॉस्फरस, फॉलिक अॅसिड, पोटॅशियम, लोह, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम यांसारखे घटक असतात.

मेथीचे पाणी किमान आठवडाभर प्यायल्याने तुमचे नक्कीच वजन कमी कमी होईल. त्याने तुमची पचनक्रिया सुधारायला मदत होईल. मेथीच्या पाण्याचे तुम्ही रोज सकाळी उपाशीपोटी सेवन करा. हे मधुमेहाच्या रुग्णांसाठी सुद्धा खुप फायदेशीर असते.

टीप: वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Edited by: Sakshi Jadhav

fat loss at home
Priyanka Chopra Daily Skin Care: वयाच्या ४२ व्या वर्षीही कशी राहिल त्वचा चमकदार? जाणून घ्या प्रियांका चोप्राच्या ब्युटीचं सिक्रेट

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com