Shani Jayanti 2023 : पैशांच्या चिंतेपासून लांब राहायचे आहे ? तर शनि जयंतीला करा हे सोपे उपाय

Do's and Don'ts on Shani Jayanti : वैशाख महिन्यातील अमावस्येच्या दिवशी हा उत्सव साजरा केला जातो.
Shani Jayanti 2023
Shani Jayanti 2023Saam Tv

What is the significance of Shani Jayanti : हिंदू दिनदर्शेकेनुसार, शनि जयंती 19 मे रोजी आहे. दरवर्षी वैशाख महिन्यातील अमावस्येच्या दिवशी हा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी शनि देवाची पूजा केली जाते. हिंदू धर्मात या अमावस्या तिथीला विशेष महत्त्व आहे.

या दिवशी पवित्र नदीत स्नान, ध्यान, पूजा, जप, तपश्चर्या आणि दान करण्याचा विधी आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने भाविक गंगेसह पवित्र नद्यांमध्ये स्नान आणि ध्यान करतात. अमावस्येच्या दिवशी पूजा, जप, तपश्चर्या आणि दान केल्याने व्यक्तीला इच्छित फळ मिळते, अशी धार्मिक धारणा आहे. ज्योतिषांच्या (Astro) मते शनि जयंतीला विशेष उपाय देखील केले जातात. हे उपाय केल्याने व्यक्तीवर शनिदेवाची (Shani Dev) कृपा होते. यासोबतच जीवनातील (Life) सर्व संकटे दूर होतात. जाणून घेऊया-

Shani Jayanti 2023
Astro Tips For Job : नोकरीतील अडथळे होतील दूर; पैशांचं टेन्शन होईल गूल,'हे' सोपे घरगुती उपाय करा

1. जर तुम्हाला सती किंवा शनीच्या साडेसातीचा त्रास होत असेल तर शनि जयंतीच्या दिवशी काळ्या वस्तूंचे दान करा. तुम्ही काळे तीळ, उडीद डाळ, काळे कपडे, मस्करा आणि काळे शूज दान करू शकता. या वस्तूंचे दान केल्याने शनिदेव प्रसन्न होतात. त्यांच्या कृपेने साडेसातीचा प्रभाव कमी होतो.

2. शनिदेवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी शनि जयंतीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठल्यानंतर सर्वप्रथम शनि देवाला नमन करावे. आता स्नान आणि ध्यान केल्यानंतर पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करा. यानंतर, 7 वेळा प्रदक्षिणा घाला. या दरम्यान, कच्चा सूत गुंडाळा. शेवटी दिवा लावून आरती करावी. पूजेच्या वेळी "ओम प्राण प्रं प्राण स: शनिश्चराय नमः" या मंत्राचा जप करावा.

Shani Jayanti 2023
Astro Tips : वय उलटून गेले पण लग्न होत नाहीये? गुरुवारी करा 'हे' उपाय, लवकरच जुळेल लग्नाचा योग

3. शनि जयंतीच्या दिवशी 1.25 मीटर काळे वस्त्र घ्या. आता कपड्यात 1.25 किलो हरभरा, एक खिळा आणि कोळशाचा तुकडा घाला आणि ते व्यवस्थित गुंडाळा. आता डोक्यावरुन 11 वेळा उतरवून वाहत्या पाण्याच्या प्रवाहात सोडून द्या. यामुळे जीवनातील सर्व दु:खांचा नाश होईल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com