Winter Hair care : हिवाळ्यात केसांची चमक टिकावयची आहे ? 'या' टिप्स फॉलो करा

थंडीच्या दिवसांत केसांच्या समस्या जास्त प्रमाणात वाढतात.
Winter Hair care
Winter Hair carecanva

Winter Hair care : जगभरात थंडीची तीव्रता हळू हळू वाढत चालली आहे. अशातच आपन आपल्या त्वचेची आणि केसांची निगा राखली पाहिजे. थंडीच्या दिवसांत केसांच्या समस्या जास्त प्रमाणात वाढतात.

थंडीच्या दिवसात आपली त्वचा कोरडी पडल्यामुळे केसांमधील मुलायमपणा , त्याचबरोबर नैसर्गिक तेल कमी होणे आणि केस गळणे या समस्या उद्भवू लागतात. अशातच सेलिब्रेटी कॉस्मेटिक डर्मेटोलॉजिस्ट डॉक्टर चित्र आनंदने त्यांच्या इंस्टाग्राम हॅण्डलवर ब्युटी आणि हेअर संबंधित एक महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. थंडीमध्ये केसांची निगा कशी राखली पाहिजे. याबद्दल त्यांनी सांगितलं आहे.

Winter Hair care
Winter Hair Fall: हिवाळ्यात केसांमध्ये कोंडा होतोय? तर 'अशी' घ्या काळजी

डॉक्टर चित्रा आनंद सांगतात की, " आपल्या केसांचं (Hair) आरोग्य (Health) इतर ऋतूंमध्ये जेवढं महत्त्वाचं असतं तेवढेच थंडीच्या दिवसात देखील ते तितकंच महत्त्वाचं असतं. थंडीच्या दिवसांत हवा शुष्क असते. याचा अर्थ असा नाही की, तुम्हाला तुमच्या केसांची काळजी (Care) घेता येणार नाही".

चित्रा आनंद पुढे असं ही बोलतात की," थंडीच्या महिन्यामध्ये आपल्या केसांची अतिरिक्त देखभाल करणे हे आपल्या केसांचं नुकसान थांबवण्यासाठी जास्त फायदेशीर ठरू शकते. आपल्या केसांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी आपल्याला फक्त चार गोष्टींकडे जास्त लक्ष द्यायला पाहिजे.

1. गरम तेलाची ट्रीटमेंट :

थंडीच्या दिवसांत आपली केसं फ्रीझी होऊन जातात. त्याचबरोबर आपल्या डोक्यात कोंड्याचे प्रमाण वाढू लागते. त्याचबरोबर आपली डोक्याची त्वचा देखील कोरडी पडू लागते आणि म्हणूनच आपल्या डोक्यात ड्रायनेस आणि खाज येऊ लागते. यासाठी तुम्ही हेअर ऑईल ट्रीटमेंट घरबसल्या करू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या आवडीचं तेल घेऊन थोडंसं गरम करून घ्यायचं आहे. नंतर तुमच्या डोक्याला व्यवस्थित तेल लावून वीस ते तीस मिनिटं मसाज करायचा आहे. दोन-तीन तासानंतर तुम्हाला तुमचे केस कोमट पाण्याने धुऊन टाकायचे आहेत. ही ट्रीटमेंट तुम्ही आठवड्यातून एकदा करू शकता.

2. डीप कंडिशनिंग मास्क :

थंडीच्या दिवसात डीप कंडिशनिंग मास्क करणे फार गरजेचे असते. डीप कंडिशनिंग मास्क केल्याने तुमच्या केसांमध्ये रासायनिक प्रक्रिया होऊन आणि गर्मीच्या संपर्कात येऊन थंडीमुळे ड्राय झालेली तुमची कसं पुन्हा हायड्रेट आणि मुलायम होतात. त्याचबरोबर डीप कंडिशनिंग मास्क हे तुमच्या केसांना प्राकृतिक चमक आणण्यास मदत करते.

Winter Hair care
Winter Hair careCanva

डीप कंडिशनिंग मास्क बनवण्यासाठी तूम्हाला तुमच्या आवडीचा डीप कंडिशनिंग मास्क तयार करायचा आहे. या मास्कला तुम्हाला केसांची मुळे सोडून संपूर्ण केसांना लावून घ्यायचा आहे. त्यानंतर पंधरा मिनिटं तुमचे केस तसेच ठेवून द्यायचे आहेत. पंधरा मिनिटे झाल्यावर कोमट पाण्याने तुम्हाला तुमचे केस धुऊन काढायचे आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे केस सुकवण्यासाठी तुम्ही केसांवर टॉवेल रगडू नये. असं केल्याने तुमची केस आणखी डॅमेज होतील.

3. हाय इंटेन्सिटी हिट ट्रीटमेंट घेऊ नये :

तुम्हाला तुमच्या केसांची निगा राखायची असेल तर केसांवरती कुठल्याही प्रकारची गरम मशीन फिरवू नये. जर तुम्ही हाय इंटेन्सिटी हिट ट्रीटमेंट घेत असाल. तर तुमचे केस लवकरात लवकर खराब होऊ शकतात आणि कोरडे पडू शकतात. तुम्ही ही ट्रीटमेंट घरी करत असाल तर सर्वात पहिले तुमच्या केसांना हिट प्रोटेक्शन सीरम लावून हा इंटेन्सिटी ट्रीटमेंट केली पाहिजे. असं केल्याने तुमच्या केसांचे जास्त प्रमाणात नुकसान होणार नाही.

winter hair care
winter hair care canva

4. आहाराकडे लक्ष देणे :

केसांना आतून स्ट्रॉंग आणि चमकदार बनवण्यासाठी तुम्हाला योग्य डाईट प्लॅन फॉलो करावा लागेल. तुम्ही तुमच्या डायट कडे व्यवस्थित लक्ष दिल्याने. थंडीच्या दिवसात देखील तुमचे केस चांगले राहू शकतात. त्यासाठी तुम्हाला तुमच्या आहारात फळे आणि ड्रायफूटचा समावेश करणे आवश्यक आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com