Breast Cancer चा धोका टाळायचाय? मग आहारात करा या TOP 5 पदार्थांचा समावेश

Breast Cancer Symptoms: स्तनाचा कर्करोग टाळण्यासाठी योग्य आहार आणि जीवनशैली अत्यंत महत्त्वाची आहे. डाळिंब, भाज्या, सोया, आवळा, पेरू आणि ऑलिव्ह ऑइल नियमित सेवन केल्यास धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो.
Breast Cancer
Breast Cancersaam tv
Published On
Summary

जेवणातील खाद्यपदार्थांचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होतो.

ब्रेस्ट कॅन्सरचा धोका टाळण्यासाठी योग्य आहार घेणं आवश्यक आहे.

शरीरातील टॉक्सिसन्स बाहेर काढणे आवश्यक आहे.

कॅन्सरची लक्षणे आढळल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे आपण आपल्या आरोग्याकडे लक्ष देणं अनेकदा विसरतो. विशेषतः महिला, ज्या घर आणि बाहेरील दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडत असतात. त्या स्वतःसाठी वेळ काढू शकत नाहीत. मात्र हाच निष्काळजीपणा कधी-कधी गंभीर आजाराचं कारण ठरू शकतो. त्यापैकी एक म्हणजे स्तनाचा कर्करोग (Breast Cancer). गेल्या काही वर्षांत भारतात या आजाराचे रुग्ण झपाट्याने वाढले आहेत. मात्र आनंदाची बाब म्हणजे योग्य आहार आणि जीवनशैली फॉलो करुन त्याचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करता येऊ शकतो.

तज्ज्ञांच्या मते, आपल्या दैनंदिन आहारात काही विशिष्ट पदार्थांचा समावेश केल्यास ब्रस्ट कॅन्सरपासून तुम्ही वाचू शकता. पुढे त्याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

डाळींबाचे फायदे

डाळींब हे फळ फक्त चविष्ट फळ नाही तर आरोग्यासाठी खजिनाच आहे. यात असणारे एलागिटॅनिन्स नावाचे अँटीऑक्सिडंट्स शरीरात कॅन्सरच्या पेशी वाढू देत नाहीत. शिवाय, हे शरीरातील एस्ट्रोजेन हार्मोनचं संतुलन राखतात, जे ब्रस्ट कॅन्सरच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे.

Breast Cancer
Colon Cancer: सतत बद्धकोष्ठतेचा त्रास होतोय, पोट साफ होत नाहीये? असू शकतो कोलन कॅन्सरचा धोका वेळीच व्हा सावध

भाज्यांचे सेवन

भाज्यांमध्ये फक्त पालेभाज्याच नाही,तर ब्रोकली, फ्लॉवर, कोबी या भाज्यांचा समावेश केला जातो. या भाज्यांमध्ये सल्फोराफेन नावाचं संयुग असतं, जे शरीराची सूज कमी करतं आणि कॅन्सरशी लढण्यास मदत करतं. या भाज्या दररोज आहारात घेतल्याने शरीरातील टॉक्सिन्सही बाहेर पडतात.

सोया आणि कडधान्ये

सोया आणि कडधान्ये म्हणजे , टोफू, मूग, मसूर हे प्रथिनांचे उत्कृष्ट स्रोतं आहेत. यात असणारे आइसोफ्लेवोन्स हे घटक शरीरातील एस्ट्रोजेनच्या प्रभावाला कमी करतात. संशोधनानुसार, जे महिला नियमितपणे सोया उत्पादनांचा आहार घेतात, त्यांना ब्रेस्ट कॅन्सरचा धोका तुलनेने कमी असतो.

आवळा आणि पेरू

आवळा आणि पेरू हे दोन्ही व्हिटॅमिन सीने परिपूर्ण आहेत. व्हिटॅमिन सी हा एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट असून तो शरीरातील फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या हानीपासून संरक्षण करतो. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी होतो. पेरूमध्ये लायकोपिन हे संयुग असतं, जे कॅन्सरच्या पेशींशी लढण्यास मदत करतं.

ऑलिव्ह ऑईल

ऑलिव्ह ऑईल हे स्वयंपाकासाठी आरोग्यदायी पर्याय आहे. यात असणारा ओलेओकेंथॉल हा नैसर्गिक घटक ब्रेस्ट कॅन्सरच्या पेशींचा नाश करण्याचे काम करतं. तसेच हे शरीरातील सूज कमी करतं, ज्यामुळे अनेक आजार टाळता येतात.

Breast Cancer
Liver Disease Symptoms: रात्री १ ते ३ दरम्यान जाग येतेय? असू शकतो लिव्हरचा धोका, वेळीच वाचा लक्षणं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com