Morning walk : रोज झटपट पटापट चालता, पण वजन काही कमी होत नाही; तुम्ही या 5 चुका करत नाहीत ना?

Health Tips : रोज वॉकिंग करूनही वजन कमी होत नसेल तर तुमच्या चालण्याच्या पद्धतीत किंवा रोजच्या सवयींमध्ये काही चुका असू शकतात. या 5 गोष्टी नक्की तपासा.
Morning walk : रोज झटपट पटापट चालता, पण वजन काही कमी होत नाही; तुम्ही या 5 चुका करत नाहीत ना?
Morning walk : रोज झटपट पटापट चालता, पण वजन काही कमी होत नाही; तुम्ही या 5 चुका करत नाहीत ना?meta ai
Published On

वजन कमी करण्यासाठी जीममध्ये जाणं किंवा महागड्या उपकरणांची गरज असतेच असं नाही. नियमित चालणं वजन कमी करण्यासाठी करता येणारा साधा, सोपा व्यायाम आहे. कारण चालताना देखील शरीराची ऊर्जा खर्च होते. कॅलरी बर्न होण्यास मदत होते. यासोबत आहार, झोप , दिवसभरातील हालचाली, व्यायाम देखील तितकाच महत्त्वाचा असतो.

सावकाश चालताय का ?

रोज वॉकला जाता पण जर सावकाश चालत असाल तर त्याचा काहीही फायदा होत नाही. चालताना शरीराची हालचाल, श्वसनाची गती वाढणं महत्त्वाचे असते. त्यामुळे एका वेगाने सतत चालणे जमत नसेल तर काही वेळ हळू काही वेळ वेगाने चालण्याचा प्रयत्न करावा.

फक्त १० मिनिटे चालणे

सुरूवातीला १० मिनिटे चालणे ठीक आहे. पण हळूहळू चालण्याचा वेग वाढवण गरजेचे आहे. अचानक चालण्याची वेळ वाढवायला जाऊ नका. यामुळे खूप जास्त थकवा जाणवेल. सुरूवातीला १० मिनिटे मग २० मिनिटे असे करत चालण्याचा कालावधी वाढवावा.

एक दिवस वॉक दुसऱ्या दिवशी दांडी

एक दिवस वॉक करून दुसऱ्यादिवशी दांडी मारत असाल. तर त्याचा थेट परिणाम वजनावर होतो. मग वजन कमी होण्याऐवजी वाढू लागतं. शरीराला रोज सकाळी वॉकिंगला जाण्याची सवय लावा. तरच काहीतरी परिणाम दिसेल.

दिवसभर बसून राहणे

सकाळी मस्त व्यायाम करून जर तुम्ही दिवसभर एकाच जागी बसत असाल तर ही सवय आताच बदला.दिवसभर बसल्याने शरीराची हालचाल कमी होते.त्यामुळे वजनाची समस्या वाढू लागते. शक्य असेल तिथे जिन्याने जा. वाहनाचा वापर न करता चालत जाण्याचा प्रयत्न करा. अशा छोट्या सवयींमुळे शरीर सतत अॅक्टिव्ह राहिल.

Morning walk : रोज झटपट पटापट चालता, पण वजन काही कमी होत नाही; तुम्ही या 5 चुका करत नाहीत ना?
Cold symptoms: सर्दी आणि फ्लूमध्ये नेमका फरक काय? ही लक्षणं दिसताच कोणता आजार आहे ते ओळखणं होईल सोपं

वॉकिंग पोझिशन

चालताना शरीराची पोझिशन योग्य ठेवणही गरजेच आहे. खांदे रिलॅक्स ठेवा. पाठ सरळ ठेवा. मान सरळ ठेवून वॉक करा आणि हात नैसर्गिक पद्धतीने हलवत राहा.

म्हणूनच वजन कमी करण्यासाठी वॉकिंग सुरू केली असेल तर फक्त किती मिनिटे चाललो यापेक्षा आपण कसे चालतोय किती चालतोय याकडेही लक्ष द्या. वॉकिंगसोबतच आहारकडेही लक्ष देणे महत्त्वाचे आहे.

Morning walk : रोज झटपट पटापट चालता, पण वजन काही कमी होत नाही; तुम्ही या 5 चुका करत नाहीत ना?
Cancer new drug: कॅन्सरच्या रुग्णांसाठी गेमचेंजर ठरणार नवं औषध! दिवसातून एक गोळी आणि आयुष्य दुप्पट होणार असल्याचा दावा
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com