प्रत्येक व्यक्तीसाठी चालणे हे फार गरजेचे आहे. रोज चालल्याने आपल्या आरोग्यावर चांगला परिणाम होतो. रोजच्या धावपळीच्या जीवनातून सर्वांनाच व्यायाम करणे शक्य नसते. चालण्याच्या या व्यायामासाठी आपल्याला कोणत्याच उपकरणाची आवश्यकता नसते. त्यासाठी आपल्याला फक्त पुरेसा वेळ हवा असतो.
चालण्याचा व्यायाम आपण कधीही करु शकतो. सध्या डिजीटलचं यूग सुरू आहे. त्यामुळे अनेक व्यक्ती तासंतास एकाच जागी बसून कामं करतात. या सर्वांसाठीच तसेच अनेक लोकांसाठी हा चालण्याचा व्यायाम खूप फायदेशीर ठरणार आहे. चालण्याच्या व्यायामात कोणालाच वयाची अट नसल्याने याचा फायदा तरुण पिढी, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक यांसारख्या सर्व वयोगटाला होतो. चालण्याच्या या व्यायामावर तुम्ही कधी विचार केला आहे का? तुमच्यासाठी चालण्याचे योग्य अंतर किती असेल? चालण्याच्या या अंतराबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत.
कोणत्याही व्यायामाचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी मनाची तयारी नेहमी असायला हवी. कधीकधी एकट्याने चालणे हे खूप फायद्याचे असते. चालण्याच्या या व्यायामामुळे आपले लक्ष केंद्रित होत असते.
US CDC ने दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक व्यक्तीने दिवसभरात ८ किलेमीटर अंतर चालले पाहिजे. दिवसभरातील हे ८ किलेमीटर अंतर आपल्या चालण्याच्या ४००० पाउलांच्या बरोबरीचे असते. दररोज हे अंतर आपण आपल्या सोयीनुसार विभागून चालू शकतो. तरुण वयोगटातील व्यक्तींनी दररोज दिवसभरात चार ते पाच किलोमीटर चालायला हवे. चालण्याचा व्यायाम आपल्या आरोग्यावर चांगला परिणाम करतोच, त्याचबरोबर वजन कमी करण्यासही फार उपयोगी आहे.
चालण्याचा व्यायाम सर्व वयोगटासाठी फार गुणकारी आहे. प्रौढांसाठी जसे चालणे चांगले आहे त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांनाही चालण्याची सवय असायला हवी. यामुळे त्यांचे आरोग्य सुधारण्यासही मदत होईल. प्रौढ आणि ज्येष्ठांनी दर आठवड्याला सुमारे १५० मिनिटे चालायला हवे. ज्येष्ठ नागरिकांनी हा व्यायाम सुरु करताना कमी अंतराने सुरुवात करावी.
यामुळे त्यांना सुरुवातीला जास्त त्रास होणार नाही. आपले हे दिवसातले २० ते ३० मिनिटे चालणे, दोन ते चार किलोमीटर बरोबरीचे आहे. लहान वर्षाच्या ६ ते १७ वयोगटातील मुलांनी दररोज ६० मिनिटे चालायला हवे. यामुळे मुलांची चालना शक्ती वाढते. शरीर आणखी सुदृढ होण्यास मदत होत असते. दररोज या वयोगटातील मुलांनी दिवसातून ३ ते ४ किलोमीटर चालण्याकडे आपले लक्ष केंद्रित केले पाहिजे.
शरीर निरोगी आणि फिट राहण्यासाठी व्यायामाची खूप गरज असते. व्यायामामुळे शरीरात बरेच बदल होतात. तसेच चालण्याचा व्यायाम केल्याने आपण तणाव मुक्त होत राहतो. त्याचबरोबर ह्रदय आणि रक्तवाहिन्या सुधारण्यास मदत होत असते. रोज चालल्याने मनाची शांती आणि स्फूर्ती वाढवण्यास बळ मिळत असते. हा व्यायाम एखाद्या व्यक्तीचे वजन कमी करण्यासाठी देखील फार फायदेशीर आहे. आपल्या स्नायूंना मजबूत करण्यासाठी आणि रोज ताजे-तवाणे , फ्रेश दिसण्यायाठी चालणे हा खूप उत्तम व्यायाम आहे. चालण्याचा व्यायाम आपल्या संपूर्ण शरीराला तंदुरुस्त ठेवण्यास मदत करतो.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.