रेस्टॉरंट किंवा महागड्या हॉटेमधलं जेवण प्रत्येकालाच आवडतं. चविष्ट पदार्थ चाखण्यासाठी अनेक खवय्ये विविध रेस्टॉरंटमध्ये भेट देतात. येथे पोटभर जेवल्यावर आपल्याला बील देताना काही मुखवास दिले जातात. यामध्ये हजमोला किंवा बडिशेप असते. बडिशेप प्रत्येक व्यक्ती आवडीने खातात.
काही व्यक्तींना घरी देखील जेवण झाल्यावर बडिशेप खाण्याची सवय असते. बडिशेप खाण्याची ही सवय आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. त्यामुळे अदगी मुठभर जरी बडिशेप खाल्ली तरी काही हरकत नाही. त्यामुळे आज बडिशेप खाण्याचे आपल्या आरोग्यासाठी काय फायदे आहेत याची माहिती जाणून घेणार आहोत.
बडिशेपमध्ये विविध पद्धतीचे औषधी गुणधर्म असतात. बडिशेपचा मुळ गुणधर्म म्हणजे ती थंड असते. त्यामुळे आपलं पोट सुद्धा थंड राहतं. तसेच जेवणानंतर बडिशेप खाल्ल्याने पोट अगदी थंड राहतं.
काही व्यक्तींची पचन क्षमता खास नसते. त्यामुळे त्यांना पोट दुखणे, गॅस होणे, अपचन अशा अनेक समस्या उद्भवतात. त्यामुळे जेवणानंतर बडिशेप खाल्ली पाहिजे. याने तुम्हाला पोटावर वाढलेली जास्तीची चरबी सुद्धा कमी करण्यास मदत होईल.
बडिशेप खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतं. यामुळे मुखवासाच्या समस्या दूर होतात. जेवणात काही व्यक्तींना कांदा खाण्याची सवय असते. कांदा खाल्ल्याने तोंडाचा वास येतो. मात्र बडिशेपने तोंडाची ही दुर्गंधी दूर होण्यास मदत होते. यामध्ये अँटीऑक्सीडंट आणि अँटीबॅक्टीरियल गुण सुद्धा असतात.
ज्या व्यक्तीच्या शरीरात जास्त हिट असते त्यांनी बडिशेपचे पाणी प्यायले पाहिजे. बडिशेपमध्ये व्हिटॅमीन सी सुद्धा असते. चेहऱ्यावर पिंपल्स असतील तर ते सुद्धा बडिशेपच्या पाण्याचे सेवन केल्याने कमी होतात.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.