Chetan Bodke
अनेकांना जेवणानंतर बडीशेप खाण्याची सवय असते. बडीशेप खाल्ल्यामुळे आपल्या आरोग्याला बरेच गुणकारी फायदे आहेत.
बडीशेप खाल्ली किंवा बडीशेपचे पाणी प्यायले तर आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.
बडीशेप पचनासाठी उत्तम आहे. बद्धकोष्ठता आणि पचनक्रिया संबंधित समस्यांपासून बडीशेपमुळे आराम मिळतो.
बडीशेपचे सेवन केल्याने कॅन्सर आणि हार्ट डॅमेजसारख्या आजारांचा धोका कमी होऊ शकतो. सोबतच हाय ब्लड प्रेशर प्रमाणात ठेवते.
बडीशेपच्या पाण्याचे सेवन केल्यामुळे वजन नियंत्रणात राहते. बडीशेपमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्यामुळे शरीरातील मेटाबॉलिझम नियंत्रणात ठेवते.
बडीशेपमध्ये व्हिटॅमिन ए चे प्रमाण जास्त असते. त्यामुळे डोळ्यांसाठी बडीशेप किंवा त्याचे पाणी फायदेशीर ठरते. डोळ्यांची दृष्टी वाढण्यासाठी मदत होते.
बडीशेपच्या पाण्याचे दररोज सेवन केल्यामुळे इम्युनिटी सिस्टिम वाढते.
बडीशेपमध्ये जास्त प्रमाणात पॉटेशियम असते. त्यामुळे शरीरातील फोलेटचे प्रमाण कमी करते आणि हाय ब्लड प्रेशर प्रमाणात ठेवते.
बडीशेपचं पाणी प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. नियमित सकाळी पाण्याचे सेवन केल्यास मधुमेह असणाऱ्या व्यक्तींना याचा फायदा होतो.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.