Chetan Bodke
प्रत्येकाच्या दिवसाची सुरूवात चहा अथवा कॉफीने पिऊन होते. हे पेय प्यायल्याने अनेकांचा मुड फ्रेश होतो.
चहा किंवा कॉफीमध्ये असलेल्या कॅफीनमुळे शरीरातला आळस तर गायब होतोच, पण शरीरामध्येही उर्जा निर्माण होते.
जर तुम्हाला चहा किंवा कॉफी आवडत नसेल तर सुकामेवा किंवा फळांचा ज्युस खाऊन आपल्या दिवसाची सुरूवात करू शकता.
सकाळी चहा किंवा कॉफी ऐवजी तुम्ही खजूर खाऊ शकता. ४ ते ५ खजुराचे सेवन केल्याने शरीराला आवश्यक ते पोषण मिळतात.
बदाममध्ये प्रथिने, फायबर, व्हिटॅमिन्स बी आणि मॅग्नेशियमचे प्रमाण जास्त आहे. दररोज बदाम खाल्ल्याने पोट भरलेले राहते.
संत्रीमध्ये 'व्हिटॅमिन सी' जास्त असते. त्यासोबतच त्यात फायबरचे प्रमाणही जास्त असते. त्यामुळे संत्री खाल्ल्याने शरीराला आवश्यक घटक मिळतात.
लिंबू आणि पुदिन्याचा ज्युस प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते. तुम्ही हे एनर्जी ड्रिंक प्यायल्याने मुडही फ्रेश राहतो.
भाजलेले तिळ खाल्ल्याने स्नायू दुखण्याची आणि थकव्याची समस्या दूर होते. प्रथिने, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम आणि तांबे यांसारखे पोषक घटक असतात.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.