Viral Video : मोबाईल मध्ये इतका गुंग होता की, चालू लिफ्टमध्ये अडकली मान; पुढच्या क्षणाला...

अपघातांशी संबंधित व्हिडिओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होतात.
Viral Video
Viral Video Saam Tv

Viral Video : इंटरेनटाचा वाढता प्रभाव पहाता आपल्याला काही ना काही रोज पाहायला मिळते. नुकत्याच इंटरनेटवर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओवर 'जाको राखे साईंया मार सके ना कोय' ही म्हण अगदी तंतोतंत बसत आहे, ज्यात काही मिनिटांत ओढावलेल्या मृत्यूला बाजूला करून एक माणूस आपला जीव वाचवतो. अशा प्रकारे कधी, कुठे, कोणासोबत अपघात होतात हे सांगता येत नाही. अपघातांशी संबंधित व्हिडिओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होतात, त्यातील काही हृदय पिळवटून टाकणारे असतात. नुकताच असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती आपल्या समजदारपणाने जीव वाचवताना दिसत आहे. (Latest Marathi News)

हा धक्कादायक व्हिडिओ रशियामधील (Russia) एका अपार्टमेंटचा आहे, जिथे एक माणसाचा जीव थोडक्यात बचावला आहे. व्हिडीओमध्‍ये पाहिले जाऊ शकते की, लिफ्ट कशी अचानक जमिनीवर न थांबता वेगाने वर जाऊ लागते.

यादरम्यान, लिफ्टमधून बाहेर पडणाऱ्या व्यक्तीची मान काही प्रमाणात वाचली जाते किंवा काही मिनिटांत मागे होऊन ती व्यक्ती कसा तरी जीव वाचवते असे म्हणता येईल. हा व्हिडिओ पाहून इंटरनेटवर सगळ्यांचीच अवस्था बिकट झाली आहे.

ही संपूर्ण घटना इमारतीमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्याचा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ यूट्यूब या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत एक लाखाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. त्याचबरोबर व्हिडिओ (Video) पाहिल्यानंतर यूजर्स वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com