सध्या पितृपंधरवाडा सुरु आहे. या दरम्यान नैवेद्यासाठी सर्वत्र भाज्यांची मागणी वाढली आहे. मागणी वाढली असली तरी परराज्यातून येणारी फळभाज्यांची आवक घटली आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यातील भाव गगनाला भिडले आहेत. भाव वाढीने शेतकरी खुश असला तरी सामान्य माणसांच्या खिशाला याने कात्री लागणार आहे. आधीच महागाईचा भडका उडालेला आहे त्यात फळभाज्या महागल्याने सामान्यांचं बजेट कोलमडणार आहे.
गुलटेकडी मार्केटयार्डमध्ये रविवारी (२२ सप्टेंबर) विविध राज्यांतून १०० ट्रक फळभाज्यांची आवक झाली आहे. आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि गुजरातमधून हिरव्या मिरचीचे ७ ते ८ टेम्पो आलेत. तर कोबी ५ ते ६ टेम्पो कर्नाटक आणि गुजरातमधून आले आहेत. तसेच कर्नाटकातून पावट्याचे २ ते ३ टेम्पो आणि आंध्र प्रदेश तामिळनाडू येथून शेवग्याचे २ ते ३ टेम्पो आणले आहेत.
पितृपक्ष सुरू होताच गाजराची मागणी सुद्धा वाढली आहे. इंदूर येथून ५ ते ६ टेम्पो गाजर आणण्यात आलेत. तसेच साताऱ्यातून ४०० ते ५०० गोणी आलं गुलटेकडी मार्केटयार्डमध्ये आणलं आहे. भेंडीचे ७ ते ८ टेम्पो, गवार ५ ते ६ टेम्पो, टोमॅटो ७ ते ८ हजार क्रेट, हिरवी मिरची ३ ते ४ टेम्पो बाजारामध्ये दाखल झालेत.
कोबी : ८०-१२० रुपये
तोंडली : ४००-४५० रुपये
शेवगा : १०००-१२०० रुपये
गाजर : ३००- ४०० रुपये
कांदा - ४४०-४८० रुपये
भेंडी : २००-३५० रुपये
गवारी : ३००-६०० रुपये
टोमॅटो : २५०-३५० रुपये
दोडका: ४००- ४५० रुपये
हिरवी मिरची : ४००-५०० रुपये
बटाटा १८०-३०० रुपये
दुधी भोपळा : १००-२०० रुपये
चवळी : ३००-४०० रुपये
लसूण : १५००- ३२०० रुपये
आले : ३००- ३५० रुपये
सुकलेलं आलं : ६००-६५० रुपये
काकडी : १५०- २०० रुपये
वांगी : २५०-३५० रुपये
डिंगरी : ४००-५०० रुपये
नवलकोल : ८०-१०० रुपये
पापडी : ४००-४५० रुपये
ढोबळी मिरची : ७००- ७५० रुपये
कारली : हिरवी ३००-३५० रुपये
पांढरी : २००-२५० रुपये
पडवळ : २००- २५० रुपये
फ्लॉवर : २५०-३०० रुपये
वालवर : ५५०-६०० रुपये
पितृपक्ष सुरू असल्याने भाज्यांची मागणी वाढली आहे. एकीकडे भाज्या महागल्यात तर दुसरीकडे फुलांचा भाव कमी झाला आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.