बालाजी सुरवसे
धाराशिव : एकवेळ टमाटा उत्पादक शेतकऱ्याला चांगला नफा मिळत होता. किरकोळसह मार्केटमध्ये चांगला दर मिळत होता. (dharashiv News) मात्र लागवड मोठ्या प्रमाणात होऊन आवक वाढली असल्याने टोमॅटोचे भाव कमी झाले आहेत. यामुळे उत्पादक शेतकऱ्याचा तोडणी व वाहतूक खर्च देखील निघेना झाला आहे.
धाराशिव जिल्ह्यातील तामलवाडी परिसरातील टोमॅटो उत्पादन सध्या संकटात सापडले आहेत. सध्या पाणी टंचाई असतानाही माळरान जमीनीवर मोठ्या कष्टाने टोमॅटो (Tomato) पिकविला आहे. उपलब्ध पाण्यावर शेतकरी (farmer) उन्हाळी फळभाज्यांची पिके घेतात. मात्र लाखो रुपयांचा खर्च करून ही भाव नसल्याने टोमॅटो उत्पादन शेतकरी हतबल झाला आहे. टोमॅटो तोडणी व वाहतूक खर्चासाठीची पदमोड करण्याची वेळ आल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
तोडणी, वाहतूक खर्चही निघेना
दरम्यान टोमॅटोला बाजारात किलोला बारा ते पंधरा रुपये दर मिळत असल्याने तोडणीसह वाहतुक खर्चासाठी देखील पदरमोड करण्याची वेळ टोमॅटो उत्पादन शेतकऱ्यांवर आली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.