Ruchika Jadhav
पालक भजी तुम्ही सर्वांनी खाल्लीच असेल. या पालेभाजी व्यतीरिक्त तुम्ही अन्य काही भाज्या एकत्र करून सुद्धा भजी बनवू शकता.
पालेभाज्यांपासून भजी बनवताना त्यात मेथीच्या भाजीची पाने सुद्धा घ्यावी.
तुम्ही कोथिंबीर सुद्धा भजी बनवण्यासाठी वापरू शकता. सर्व भाज्या आधी छान बारीक चिरून घ्या.
बारीक चिरलेल्या भाज्यांमध्ये बेसन पिठ मिक्स करा.
चवीनुसार यामध्ये मिठ सुद्धा मिक्स करा. त्याने भजीची चव आणखी वाढते.
भज्यांची चव वाढवी यासाठी त्यामध्ये जीरे आणि ओवा सुद्धा मिक्स करून घ्या.
भजी चवचार आणि चटकदार लागावेत यासाठी त्यामध्ये मसाले, लाल तिखट आणि हळद मिक्स करा.
त्यानंतर तयार भजी मस्त तेलात तळून घ्या. तयार झाली चमचमीत पालेभाज्यांची मिक्स भजी.