Vastu Disha For Puja Vidhi: घरात कोणत्या दिशेला बसून पूजा केल्याने धनप्राप्ती होते? जाणून घ्या

Vastushastra Information Marathi: दिशेतील प्रकाशाच्या संपर्कात आल्यास त्याचे विविध परिणाम आपल्यावर होत असतात.
Vastu Tips
Vastu Tipssaam tv

Vastu Tips In Marathi: हिंदू धर्मात दिशांचे महत्व खूप आहे. दिशाचा संबंध सूर्याशीही आहे. ज्योतिषांच्या माहितीनुसार, प्रत्येक दिशेतील प्रकाशाचा वेगवेगळा प्रभाव असतो. या वेगवेगळ्या दिशेतील प्रकाशाच्या संपर्कात आल्यास त्याचे विविध परिणाम आपल्यावर होत असतात. या दिशेबद्दल अधिक माहिती जाणून घेतल्यास त्याचे लाभही होऊ शकतात. (Latest Marathi News)

वास्तूशास्त्रानुसार घरातील प्रत्येक दिशेत ऊर्जा असते. या उर्जेचा आपल्या जीवनावर चांगला किंवा वाईट प्रभाव पडतो. अनेक जण आपल्या घरात देवाचा देव्हारा ठेवत असतो. देव्हारा योग्य दिशेला ठेवल्यास त्याचे अनेक फायदे आहेत. हिंदू धर्मातील दिशेचं महत्व जाणून घेऊयात.

Vastu Tips
Shukra Vakri 2023 : अधिक मासात शुक्र ग्रह होणार वक्री ! या राशींवर येणार मोठ संकट, अचानक धनलाभाची शक्यता

पूर्व दिशा

पूर्व दिशेला तोंड करून धार्मिक कार्य करणे अधिक फायदेशीर ठरते. या दिशेला सूर्य आणि बृहस्पतिचा अधिक प्रभाव असतो. या दिशेत धार्मिक कार्य केल्याने मान-सन्मान आणि ज्ञान मिळतं. त्यामुळे पूजा, अभ्यास पूर्व दिशेला तोंड करूनच करावे.

पश्चिम दिशा

पश्चिम दिशा ही शनिची दिशा असते. या दिशेत पूजा केल्याने घरातील सदस्य, नातेवाईक आणि घरात प्रसन्नता निर्माण होते. या दिशेला तोंड करून जेवण करणे चांगले नाही. या दिशेला डोक करून झोपल्याने आरोग्याच्या समस्या जाणवतात. तसेच आर्थिक नुकसान देखील होतं. या दिशेला ध्यान आणि प्रार्थना केल्याने अनेक लाभ होतात.

उत्तर दिशा

धनाच्या दृष्टीने उत्तर दिशेला विशेष महत्व आहे. वास्तुशास्त्रानुसार, या दिशेला तोंड करून कोणत्याही कार्याची सुरूवात आणि व्यवसाय करणे चांगलं मानलं जातं. या दिशेला देवी लक्ष्मीजीची पूजा केल्याने धनप्राप्ती होते.

Vastu Tips
Chanakya Niti On Women : या महिलांवर चुकूनही विश्वास ठेवू नका, आयुष्यभर पश्चातापाची वेळ येईल

दक्षिण दिशा

दक्षिण दिशेला स्वामी मंगल आणि यम असतो. या दिशेला दोष असल्यास घरातील सदस्यांमध्ये वादविवाद होतात. संपत्तीवरून दोन भावांमध्येही वाद होतात. या दिशेला भगवान हनुमानजीची पूजा केल्याने विशेष लाभ मिळतात. या दिशेला मंगल यंत्र स्थापित केल्यावर सर्व समस्या दूर होतात.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com