Vastu Tips: व्यवसायानुसार बेडरुममध्ये 'या' गोष्टी ठेवा, प्रत्येक प्रयत्न यशस्वी होईल

या उपायांचा योग्य पद्धतीने अवलंब केल्यास व्यक्तीला करिअरमध्ये यश मिळते.
Vastu Tips
Vastu TipsSaam Tv
Published On

मुंबई: अनेक वेळा खूप मेहनत करुन, प्रयत्न करुनही आपल्याला कामात यश मिळत नाही. सकारात्मक उर्जेच्या प्रवाहात अडथळा हे याचं एक मोठं कारण असू शकते. सकारात्मक उर्जेचा सतत प्रवाह राहण्यासाठी वास्तुशास्त्रात (Vastu Tips) अनेक उपाय सांगण्यात आले आहेत.

Vastu Tips
Vastu Tips: तुम्हीही तुमच्या पाकिटात जुनं बिल ठेवता, आजच टाकून द्या; अन्यथा....

या उपायांचा योग्य पद्धतीने अवलंब केल्यास व्यक्तीला करिअरमध्ये (Career) यश (Success) मिळते, असं म्हटलं जाते. असे केल्याने जीवनात समृद्धी प्राप्त होते. या उपायांमुळे करिअरमधील अडचणी दूर होण्यास मदत होते. या उपायांमुळे घरातील वास्तुदोष (Vastu) दूर होण्यास मदत होते. जाणून घेऊया त्या उपायांबाबत -

यश मिळवण्यासाठी हे वास्तू उपाय करा

🔴 जर तुम्ही कपड्यांशी संबंधित व्यवसाय करत असाल तर तुमच्या बेडरुममध्ये (Bedroom) किंवा कपड्याच्या वॉर्डरोबमध्ये लाल रंगाचा स्कार्फ ठेवा.

🟢नोकरी करणाऱ्यांनी त्यांच्या बेडरुममध्ये एक्वेरियम ठेवावा. आपण रंगीबेरंगी माशांचे पेंटिंग देखील लावू शकता.

🔴संगीत क्षेत्राशी संबंधित लोकांनी आपल्या बेडरुममध्ये विणा किंवा बासरी ठेवावी. फर्निचर किंवा लाकडाच्या कामाशी संबंधित लोकांनीही आपल्या बेडरुममध्ये बासरी ठेवावी.

🟢लेखक, पत्रकार आणि सामाजिक कार्याशी संबंधित व्यक्तींनी आपल्या बेडरुममध्ये वेगवेगळ्या रंगांचे पेन ठेवावे.

🔴जे अन्नासंबंधी व्यवसायात आहेत त्यांनी आपल्या बेडरुममध्ये गायीची मूर्ती किंवा चित्र ठेवावे.

🟢जर तुमचा इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा व्यवसाय असेल तर तुम्ही तुमच्या बेडरुममध्ये क्रिस्टल ठेवावे.

🔴जे फार्मसी व्यवसायात आहेत त्यांनी आपल्या खोलीत सूर्यनारायणाचे चित्र लावावे.

(टीप - वर दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि मान्यतांवर आधारित आहे, याचा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही.कुठलाही उपाय करण्यापूर्वी जाणकारांचा सल्ला नक्की घ्या)

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com