मांजर एक पाळीव प्राणी आहे. अनेक व्यक्ती आपल्या घरात मांजर पाळतात. वास्तुशास्त्रात विविध प्राणी आणि पशू-पक्षी यांच्याशी संबंधित वेगवेगळे संकेत मानले जातात. अनेक प्राणी आणि पक्षी आपल्यासाठी शुभ मानले जातात. तर काही प्राणी आपल्यासाठी अशुभ सुद्धा मानले जातात. तुमच्या आजूबाजूला किंवा घरात मांजर असेल तर ही माहिती तुमच्यासाठी खास ठरणार आहे. कारण यात मांजरीचे काही शुभ आणि काही अशुभ संकेत देण्यात आले आहेत.
मांजर पाळणे शुभ की अशुभ
अनेक घरात व्यक्ती आपल्या आवडीनुसार मांजर पाळतात. मांजर विविध वाईट शक्तीपासून आपलं रक्षण करते. त्यामुळे काही व्यक्ती मांजर शुभ मानतात. तर काही घरांमध्ये मांजर असल्याने राहू योग सुरू होतो असं म्हटलं जातं. त्याने आपल्या आयुष्यात अडचणी आणखी वाढतात.
घरात मांजरीच्या पिल्लाचा जन्म होणे
ज्या घरात एखादी मांजर आपल्या बाळाला जन्म देते तिथे सुख शांती आणि समृद्धी नांदते. अशा घरात असलेल्या सर्व नकारात्मक ऊर्जा दूर निघून जातात. तसेच या घरात वाद आणि भांडणे झाली तरी ती फक्त काही काळापुरती मर्यादित राहतात.
मांजरीचा रंग
भारतात विविध रंगाच्या मांजरी आहेत. यातील तांबड्या म्हणजेच गोल्डन किंवा सोनेरी रंगाची मांजर आपल्यासाठी शुभ असते. ही मांजर घरात असल्याने त्या व्यक्तीच्या जीवनात धनलक्ष्मी कायम प्रसन्न राहते. तर काळी मांजर नेहमी अशुभ मानली जाते. घरात काळी मांजर येऊन अचानक रडू लागली तर याचा आपल्या जीवनावर वाईट परिणाम होतो. मांजर रडणे म्हणजे अशुभ गोष्टींचा संकेत असतो.
बाजारात सध्या विविध देशी आणि विदेशी मांजरी अनेक व्यक्ती पाळतात. काही व्यक्ती आवरजून काळी मांजर घरात पाळतात. वास्तुशास्त्रात या मांजरीचा रंग आणि विविध स्थितीवर भाष्य करण्यात आलं आहे. तसेच शुभ काय आणि अशुभ काय हे सांगण्यात आलं आहे. मात्र हे सर्व आपल्या मान्यतेवर आहे. मांजरी बद्दल तुमच्या मनात काहीच शंका नसेल तर तुम्हाला याचा काहीच त्रास होणार नाही, असे अनेक तज्ज्ञ मंडळी सांगतात.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.