Vastu Shastra Tips : लहान मुलांच्या बेडरुमची खिडकी चुकूनही 'या' दिशेला नसावी; नैराश्यासह आरोग्यावर होईल वाईट परिणाम

Window of Children Room : खाण्यापिण्यासह, खेळण्याच्या सर्व गोष्टींवर विशेष लक्ष दिलं जातं. या सर्वामध्ये वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांचा बेडरुम देखील योग्य दिशेला असणे आवश्यक आहे.
Window of Children Room
Vastu Shastra Tips Saam TV

प्रत्येक पालक आपल्या लहान मुलांच्या संगोपनासाठी भरपूर मेहनत घेतात. आपल्याला ज्या ज्या गोष्टी मिळल्या नाहीत त्या सर्व आपल्या मुलांना मिळाव्यात असं पालकांना वाटत असतं. त्यासाठी लहान मुलांना वेगळा बेडरुम दिला जातो. त्यांच्या खाण्यापिण्यासह, खेळण्याच्या सर्व गोष्टींवर विशेष लक्ष दिलं जातं. या सर्वांमध्ये वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांचा बेडरुम देखील योग्य दिशेला असणे आवश्यक आहे.

Window of Children Room
Vastu Tips: रात्री झोपण्यापूर्वी घरात करा हा उपाय, Negativity होईल दूर

लहान मुलं फार चंचल मनाची असतात. चांगल्या आणि वाईट सर्वच गोष्टी ते लवकर कॅच करतात. त्यामुळे त्यांच्या आजुबाजूला सतत पॉझिटीव्ह वातावरण असले पाहिजे. अन्यथा लहान मुलांच्या मनावर तसेच त्यांच्या बौद्धिक क्षमतेवर याचा वेगळा परिणाम होतो. त्यामुळे आज याबाबतच सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

पॉझिटिव्ह एनर्जी

बेडरुममध्ये फक्त खिडकी किंवा बाल्कनीमधूनच सूर्यप्रकाश येत असतो. त्यामुळे लहान मुलांचा बेडरूम बनवताना ती खोली अंधारात नसावी. दिवसा तेथे लाइट लावण्याची आवश्यकता नसावी. दिवसभर त्या रुममध्ये सूर्यप्रकाश यायला हवा. सूर्यप्रकाश आल्याने रुममध्ये सकारात्मर उर्जा निर्माण होते. त्यामुळे बेडरूम बनवताना ही काळजी घ्या.

दिशा

लहान मुलांच्या बेडरुमची खिडकी पूर्व किंवा उत्तर दिशेला असावी. या दोन्ही दिशांमधून सूर्यप्रकाश योग्य प्रमाणात मिळतो. त्यामुळे कधीच खिकडी दक्षिण दिशेला बनवू नका. जर तुमच्याकडे पूर्ण आणि उत्तर दिशेचा पर्याय नसेल तर लहान मुलांच्या रुमची खिडकी पश्चिमेला बनवा मात्र दक्षिण दिशेला कधीच बनवू नका. याने मुलांच्या बौद्धिक क्षमतेवर परिणाम होतो.

जड खिडकी नको

लहान मुलं सतत खेळणे, मजा-मस्ती करण्याच्या मूडमध्ये असतात. रुममध्ये त्यांचा जास्त वेळ खिडकी किंवा बाल्कनीजवळच ते घालवतात. त्यामुळे घरामध्ये कधीही जड खिडकी लावू नका. हलकी आणि वाऱ्याने बंद होणार नाही यासाठी त्याला कडी बसवून घ्या. कारण हवेमुळे खिडकी जोरात बंद झाली तर लहान मुलांचे बोट किंवा हात-पाय त्यामध्ये अडकले जाऊ शकतात. त्यामुळे खिडकी बाबत ही विशेष काळजी घ्या.

टीप : ही फक्त सामान्य माहिती आहे. साम टीव्ही या माहितीचा दावा करत नाही.

Window of Children Room
Vastu Tips : जेवण बनवताना हातून अचानक तेल सांडलं; मग तुमच्यावरही येऊ शकतं 'हे' संकट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com