Toothpaste Use: भरपूर टूथपेस्ट लावून ब्रश करता? सावधान! दातांचे होईल गंभीर नुकसान

Oral Hygiene: जास्त टूथपेस्ट वापरल्याने फ्लोराइड टॉक्सिसिटी, दातांचे इनेमल नुकसान आणि संवेदनशीलता वाढू शकते. डॉक्टरांच्या मते फक्त मटराएवढी टूथपेस्टच दातांसाठी सुरक्षित आणि प्रभावी असते.
fluoride toxicity
Using Excess Toothpaste Can Damage Your Teethgoogle
Published On

ओरल हायजीन चांगली ठेवण्यासाठी दिवसातून दोन वेळा ब्रश करण्याचा डॉक्टर नेहमी सल्ला देतात. तरीही अनेकांना दातांच्या समस्या जाणवतात. यामागे चुकीच्या पद्धतीने ब्रश करणे ही मोठी गोष्ट कारणीभूत असू शकते. तुम्हीही ब्रश करताना टूथब्रशवर भरपूर टूथपेस्ट लावता? असे केल्याने दात मोत्यासारखे चमकतात असे वाटत असेल तर हा गैरसमज लगेचच दूर करा. कारण जास्त प्रमाणात टूथपेस्ट वापरणे दातांसाठी धोकादायक ठरू शकते.

जास्त टूथपेस्ट वापरल्याने पहिला धोका म्हणजे फ्लोराइडचा जास्त प्रमाणात शरीरात प्रवेश होणे. खूप मोठ्या प्रमाणात टूथपेस्ट गिळल्यास फ्लोराइड टॉक्सिसिटीची शक्यता वाढते. यामुळे उलटी, पोटदुखी, जुलाब, चक्कर येणे यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. खूप गंभीर परिस्थितीत लिव्हर, किडनी आणि हार्टवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे ब्रश करताना टूथपेस्ट गिळली जाणार नाही, याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.

जास्त टूथपेस्ट, जोरात किंवा कडक ब्रशचा वापर यामुळे दातांचे इनेमल घासले जाते. इनेमल कमी झाल्यास दात संवेदनशील होतात, सडणे सुरू होते आणि हिरड्यांना इजा होऊ शकते. त्यामुळे नेहमी मऊ ब्रिसल असलेला ब्रश आणि कमी प्रमाणात फ्लोराइडयुक्त टूथपेस्ट वापरणेच योग्य आहे.

लहानपणी अतिप्रमाणात फ्लोराइडच्या संपर्कात आल्याने डेंटल फ्लोरोसिस होऊ शकते. या स्थितीत दातांवर पांढरे किंवा तपकिरी डाग, रेषा किंवा गंभीर प्रकरणात खड्डे दिसू शकतात. मुलांनी टूथपेस्ट गिळण्याचा धोका जास्त असल्याने त्यांच्यासाठी टूथपेस्टची मात्रा विशेष काळजीपूर्वक ठरवणे गरजेचे आहे.

तज्ञांच्या मते, प्रौढांनी फक्त मटराच्या दाण्याएवढीच टूथपेस्ट वापरावी. हे प्रमाण दातांना आवश्यक तेवढा फ्लोराइड पुरवते आणि इनेमलचे संरक्षण करते. मुलांसाठी नियम वेगळे आहेत. तीन वर्षांखालील मुलांसाठी तांदळाच्या दाण्याएवढी, तर 3 ते 6 वर्षांतील मुलांसाठी मटराएवढी टूथपेस्ट योग्य मानली जाते. कारण या वयात मुले ब्रश करण्याची पद्धत शिकत असतात आणि ते चुकून टूथपेस्ट गिळण्याची शक्यता असते.

fluoride toxicity
Kakdi Pohe Recipe: रोज नाश्त्याला इडली-वडे खावून कंटाळलात? मग खमंग काकडी पोहे एकदा खाऊन पाहाच

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com