Different Metal Jewelry : सोने-चांदीहून सुंदर दिसणारे अन्य धातूंचे दागिने; किंमत आणि कॉलीटी वाचून व्हाल थक्क

Trending Jewellery : सोने-चांदी नाही तर जगात आहे या 4 धातूंपासून बनवलेल्या दागिन्यांची सर्वाधिक मागणी. स्वस्तात मस्त दागिने तुम्हीही करा ट्राय
Trending Jewellery
Different Metal JewelrySaam TV
Published On

अनेकदा महिला दागिन्यांसंदर्भात गप्पा करताना दिसतात. मात्र कोणी तुमच्याशी दागिन्यांबद्दल संवाद साधत असेल तर केवळ सोने आणि चांदीचा विचार येतो आणि त्याबद्दलच संवाद साधला जातो. सोन्याचांदीचे दागिने भारतात शतकानुशतके परिधान केले जातात. मात्र आता अनेक ठिकाणी लोक प्लॅटिनमचे दागिने वापरू लागले आहेत. परंतू याशिवाय, तुम्ही इतर धातूंपासून बनवलेल्या दागिन्यांबद्दल ऐकले आहे का? जे आता जगात हिट होत आहेत. त्यांची चमक आणि त्यांचे घडणावळ पाहण्यासारखी आहे.

Trending Jewellery
Gold Silver Rate : अर्थसंकल्पानंतर सोने-चांदी दरात सर्वात मोठी घसरण; कितीने कमी झाला भाव? वाचा...

विशेषत: या धातूंपासून बनवलेले दागिने भारताशेजारील चीन, अमेरिका आणि युरोप या देशांमध्ये खूप लोकप्रिय झाले आहेत. या धातूंची नावे आहेत पॅलेडियम, टायटॅनियम, स्टील, तांबे आणि टंगस्टन. या धातूंचे दागिनेही अनेक देशांमध्ये लोकप्रिय होत आहेत. यापैकी काही धातू त्यांच्या अद्वितीय गुणधर्मांमुळे आणि सौंदर्यामुळे काही देशांमध्ये हे दागिने खूप लोकप्रिय आहेत. चला जाणून घेऊया त्या धातूंबद्दल ज्यांचे दागिने जगात खूप प्रसिद्ध आहेत.

प्लॅटिनम

प्लॅटिनम हा एक दुर्मिळ आणि महागडा धातू आहे, जो त्याच्या कठिणपणा आणि सौंदर्यामुळे दागिने बनवण्यासाठी वापरला जातो. चीनमध्ये प्लॅटिनमचे दागिने खूप लोकप्रिय आहेत. विशेषत: नववधूंना लग्नात प्लॅटिनमचे दागिने घातले जातात.

टायटॅनियम

टायटॅनियम एक मजबूत आणि स्वस्त धातू आहे, जो त्याच्या अद्वितीय गुणधर्मांमुळे दागिने बनवण्यासाठी वापरला जातो. टायटॅनियम ज्वेलरी जपानमध्ये खूप लोकप्रिय आहे, विशेषतः तरुणांमध्ये त्याची मागणी जास्त आहे.

स्टील

पोलाद हा एक मजबूत आणि परवडणारा धातू आहे, जो त्याच्या ताकद आणि सौंदर्यामुळे दागिने बनवण्यासाठी वापरला जातो. स्टीलचे दागिने भारतात खूप लोकप्रिय आहेत, विशेषतः मध्यमवर्गीय लोकांमध्ये त्याची मागणी जास्त आहे.

तांबे

तांबे हा एक सुंदर आणि परवडणारा धातू आहे. जो त्याच्या मऊसर गुणधर्मामुळे अर्थातच आकार देण्यासाठी सोपा असल्याने दागिने बनवण्यासाठी वापरला जातो. मोरोक्कोमध्ये तांब्याचे दागिने खूप लोकप्रिय आहेत, विशेषत: पर्यटकांमध्ये त्याची मागणी अधिक आहे.

या धातूंनी बनवलेले दागिने केवळ सुंदरच दिसत नाहीत, तर ते मजबूत आणि टिकाऊही असतात. हेच कारण आहे की सोन्या-चांदीशिवाय जगातील लोकांना या धातूंनी बनवलेले दागिनेही घालायला आवडतात. त्यामुळे तुम्हाला देखिल इतरांपेक्षा वेगळे आणि सुंदर दिसायचे असेल तर हे दागिने नक्की ट्राय करा.

Trending Jewellery
Gold-Silver Rate : सलग चौथ्या दिवशी सोने -चांदीच्या किंमती गडगडल्या; वाचा आजचा भाव काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com