IRCTC South India Tour: IRCTC चं नवं टूर पॅकेज! नवीन वर्षात करा दक्षिण भारताची सफर, बजेटमध्ये फिरा

IRCTC South India Tour: थंडीत फिरायला जाण्याची मज्जा काही वेगळीच असते.
IRCTC South India Package Explained in Marathi
IRCTC South India Package Explained in MarathiIRCTC South India Package - Saam Tv
Published On

IRCTC Package For New Year:

थंडीला सुरुवात झाली आहे. थंडीत फिरायला जाण्याची मज्जा काही वेगळीच असते. अनेकजण नवीन वर्षात फिरायला जाण्याचा प्लान करत असतील. तर ही माहिती खास तुमच्यासाठी. IRCTC ने नवीन वर्षासाठी फिरायला जाण्यासाठी एक नवीन पॅकेज लाँच केले आहे.

IRCTC हे नेहमीच प्रवाशांसाठी नवनवीन टूर पॅकेज लाँच करत असतात. नवीन वर्षासाठी त्यांनी नवीन पॅकेज लाँच केले आहे. नवीन वर्षात तुम्ही साउथ इंडिया फिरु शकतात. मार्चमध्ये तुम्ही या पॅकेजचा लाभ घेऊ शकतात.

IRCTC South India Package Explained in Marathi
Vastu Tips : चुकूनही या 4 गोष्टी फुकटात घेऊ नका, सतत करावा लागेल गरीबीचा सामना

दक्षिण भारत टूर

पॅकेज कालावधी- ५ रात्र, ६ दिवस

प्रवासाचे साधन- विमान

डेस्टिनेशन- कन्याकुमारी, कोवलम, मधुराई, रामेश्वरम, त्रिवेंद्रम

या सुविधांचा समावेश

  • प्रवासासाधी विमानाचा वापर केला जाणार आहे.

  • राहण्यासाठी ३ स्टार हॉटेलमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे.

  • टूर पॅकेजमध्ये नाश्ता आणि जेवण ही सुविधा मिळेल.

  • स्थानिक ठिकाणी फिरायला एसी बसची सोय

  • ट्रेवल इन्शुरन्स (Travel Insurance)देण्यात आला आहे.

IRCTC South India Package Explained in Marathi
मुंबईत धावणार Electric Water Taxi, बेलापूर ते एलिफंटाचा प्रवास होणार अधिक मजेशीर...

खर्च

जर तुम्ही एकटे या ट्रीपवर जात असाल तर ५१,००० रुपये भरावे लागणार आहेत.

तसेच दोन लोकांसाठी ३९,६०० रुपये खर्च येईल.

तीन लोकांसाठी ३८,००० रुपये खर्च होईल.

लहान मुलांसाठी तुम्हाला वेगळे पैसे भरावे लागणार आहेत.

अशा प्रकारे बुकिंग करु शकता

या पॅकेजची बुकींग तुम्ही आयआरसीटीसीच्या अधिकृत वेबसाइटवरुन करु शकता. यासोबत आयआरटीसी पर्यटक सुविधा केंद्र, प्रादेशिक कार्यालयांमधूनही करु शकता. या पॅकेजची संपू्ण माहिती IRCTC च्या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.

IRCTC South India Package Explained in Marathi
Heart Attack Reason: तरुणांमध्ये का वाढतंय हार्ट अटॅकचं प्रमाण? ICMR च्या अभ्यासातून चक्रावून टाकणारी माहिती

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com