WhatsApp Translation Feature: WhatsAppचं जबरदस्त अपडेट, आता प्रत्येक भाषेचं होणार भाषांतर, पण कसं? जाणून घ्या...

WhatsApp Update: व्हॉट्सअॅपने नवं ट्रान्सलेशन फीचर आणलं आहे. आता युजर्स थेट चॅटमध्ये मेसेजेस ट्रान्सलेट करू शकतात. ही सुविधा अँड्रॉईड व आयफोनसाठी टप्प्याटप्प्याने रोलआउट होणार आहे.
WhatsApp Suspends 9.8 Million Indian Accounts to Curb Spam, Fake News, and Abuse
WhatsApp Suspends 9.8 Million Indian Accounts to Curb Spam, Fake News, and Abusegoogle
Published On

जगभरात तब्बल ३ अब्जांहून अधिक WhatsApp युजर्स आहेत. याच युजर्ससाठी WhatsAppने आपल्या अ‍ॅपमध्ये नवे फीचर आणले आहे. आता युजर्स मेसेजचे ट्रान्सलेशन थेट चॅटमध्येच करू शकणार आहात. हे फीचर खासगी संवादसाठी, ग्रुपमध्ये आणि चॅनल अपडेट्समध्येही वापरता येणार आहे.

WhatsAppकंपनीने यावेळी युजर्सच्या प्रायव्हसीला पहिले प्राधान्य दिले आहे. सर्व ट्रान्सलेशन प्रक्रिया ही युजर्सच्याच्या मोबाईल डिव्हाइसवरच होणार आहे. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅपलाही ट्रान्सलेट केलेला कंटेंट पाहता येणार नाही. ही सुविधा जगभरातील्या विविध भाषांच्या लोकांना एकमेकांशी स्पष्टपणे बोलण्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे, असे कंपनीने जाहीर केले आहे.

WhatsApp Suspends 9.8 Million Indian Accounts to Curb Spam, Fake News, and Abuse
Chanakya Niti: आयुष्यभर तुमच्यावर पडेल पैशाचा पाऊस, फक्त या ७ गोष्टी फॉलो करा! चाणक्य निती काय सांगते?

WhatsApp Translate हे फीचर वापरण्यासाठी युजर्सनी WhatsApp अपडेट ठेवणे आवश्यक असणार आहे. अपडेट आल्यानंतर फक्त कुठलाही मेसेज प्रेस करुन ठेवायचा आणि त्यावर 'Translate'हा पर्याय निवडायचा. त्यानंतर हवी ती भाषा निवडायची. हवे असल्यास तुम्हाला ती भाषा भविष्यासाठी डाउनलोडही करता येईल.

WhatsAppने ही सुविधा टप्प्याटप्प्याने रोलआउट होणार असून सुरुवातीला अँड्रॉईड युजर्ससाठी इंग्रजी, स्पॅनिश, हिंदी, पोर्तुगीज, रशियन आणि अरबी अशा सहा भाषांमध्ये ट्रान्सलेशनची सोय उपलब्ध होणार आहे. आयफोन वापरकर्त्यांसाठी मात्र सुरुवातीलाच १९ हून अधिक भाषांमध्ये हे फीचर उपलब्ध होणार आहे. अँड्रॉईड युजर्ससाठी कंपनीने आणखी एक पर्याय दिला आहे. यामुळे युजर्स संपूर्ण चॅट थ्रेडसाठी ऑटोमॅटिक ट्रान्सलेशन सुरू करू शकतील. त्यामुळे त्या चॅटमधील पुढील सर्व मेसेजेस आपोआप निवडलेल्या भाषेत Translate होणार आहेत.

WhatsApp Suspends 9.8 Million Indian Accounts to Curb Spam, Fake News, and Abuse
Cholesterol Control Tips: गोळ्या, औषधं घ्यायची गरजच नाही! ५ उपाय करतील कोलेस्ट्रॉल कमी, तज्ज्ञांनी नेमकं काय सांगितलं?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com