Toll Plaza Rules: टोल नाक्यावर १० सेकंदांपेक्षा जास्त वेळ थांबल्यास टॅक्स भरावा लागतो का? जाणून घ्या नियम

Toll Plaza Rules in India : टोल भरण्यापेक्षा त्याच्या लांबलचक रांगेतून आपली सुटका कधी होते हा प्रश्न अनेकांना पडतो.
Toll Plaza Rules
Toll Plaza RulesSaam tv

New Toll Plaza Rules :

टोल नाका म्हटलं की सगळ्यात आधी पाहायला मिळते ती लांबलचक वाहनांची रांग. रेल्वे, बस स्टँडवर ज्याप्रमाणे गर्दी असते अगदी तशीच काही. लांबचा पल्ला गाठताना बरेचदा आपल्याला टोल भरावा लागतो.

टोल भरण्यापेक्षा त्याच्या लांबलचक रांगेतून आपली सुटका कधी होते हा प्रश्न अनेकांना पडतो. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहतूक घेऊन जाण्यासाठी टॅक्स भरावा लागतो. टोलची किमत ही तुम्हाला ज्या ठिकाणी जायचे आहे यावर अवलंबून असते. काहींना यासाठी १०० रुपये मोजावे लागतात तर काहींना २०० रुपये. पण तुम्हाला माहित आहे का? १० सेकंदापेक्षा जास्त वेळ टोल नाक्यावर थांबल्यास कोणताही कर भरावा लागत नाही, कायदा काय सांगतो जाणून घेऊया

दोन वर्षांपूर्वी भारतीय (Indian) राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) ने मार्गदर्शन सुचना जारी केली होती. यामध्ये असे नमूद करण्यात आले होती की, भारतातील कोणत्याही टोल प्लाझावर १० सेकंदांपेक्षा वाहनांची (Vehicle) रांग नसायला हवी. जाणून घेऊया टोलच्या नियमांबद्दल

1. टोल सर्व्हिस टाइम म्हणजे काय?

टोल टॅक्स भरल्यानंतर वाहनांना टोल बूथच्या पलीकडे जाण्यासाठी जो वेळ लागतो त्याला सर्व्हिस टाइम म्हटले जाते. टोल नाक्यावर होणारी वाहनांची गर्दी कमी करण्यासाठी ही सुविधा करण्यात आली आहे. तसेच नियमानुसार (Rules) टोल प्लाझावर वाहनांची गर्दी ही १०० मीटरपेक्षा जास्त लांब नसावी.

Toll Plaza Rules
Most Dangerous Fort In Nashik : सह्याद्रीच्या कुशीत वसलेला नाशिकमधील भयावह किल्ला, निसर्गाचं सौंदर्य पाहून पर्यटकांना पडते भुरळ!

2. नियम काय सांगतो?

  • कोणत्याही राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या टोलनाक्यांवर वाहनांची प्रतिक्षा वेळ १० सेकंदापेक्षा जास्त नसावी. असे झाल्यास तुम्ही कोणत्याही कराशिवाय पुढे जाऊ शकता.

  • कोणत्याही टोल नाक्यावर वाहनांची लाईन १०० मीटरपेक्षा जास्त नसावी.

  • १०० मीटरपेक्षा जास्त वेळ रांगेत थांबावे लागल्यास टोल न भरता जाऊ शकता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com